Ticker

6/recent/ticker-posts

युवा पिढीत राष्ट्रीयत्वाची भावना वृद्धिंगत करण्यात राष्ट्रीय छात्र सेनेचे उल्लेखनीय योगदान- डॉ. ययाती तायडे






युवकांच्या देशातील सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला देशप्रेम, सामाजिक सदभावना, परिवारीक जबाबदाऱ्या समजून घेणे काळाची गरज असून सुदैवाने राष्ट्रीय छात्र सेनेच्या निमित्ताने शालेय तथा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी राष्ट्रीयत्वाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचे आश्वासक प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण संस्थेचे अधिष्ठाता तथा राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यापीठस्तरीय प्रेरक प्रा. डॉ. ययाती तायडे यांनी केले. एन सी सी च्या 11 महाराष्ट्र बटालियन अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एन.सी.सी. सब युनिटच्या पदवाटप समारंभाचे आयोजन नुकतेच कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात अकोला येथील नाहेप सभागृह संपन्न झाले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून उपस्थित कॅडेट्स ला मार्गदर्शन करताना तें बोलतं होते. आपल्या विद्यापीठाने राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्वाधिक कॅडेट्स बटालियनला जोडत राष्ट्रीय तथा राज्यस्तरावर विविध प्राविण्य प्राप्त केल्याचे देखील डॉ. तायडे यांनी याप्रसंगी अवगत केले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई,  कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी.सी अकोला येथील कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुनील कुमार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. तर वनविद्या महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश हरणे,कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख डॉ सुचिता गुप्ता, एनसीसीचे विद्यापीठ समन्वयक  डॉ. हर्षवर्धन देशमुख, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे ,,  11 महाराष्ट्र एन. सी.सी. बटालियन येथील सुभेदार लाभसिंग आदीची आवर्जून उपस्थित होती.

कार्यक्रमाचे सुरुवातीला लेफ्टनंट दारासिंग राठोड यांनी उपस्थितांचे शब्दसुमनाने स्वागत केले तथा डॉ पं दे कृ वि एन सी सी युनिट बाबत सविस्तर माहिती दिली .या प्रसंगी डॉ संदीप हाडोळे यांनी वाढीव एनरोलमेंट व राष्ट्रीय कॅम्प मध्ये संधी मिळावी या बाबत मागणी केली.प्रमुख अतिथी लेफ्टनंट कर्नल सुनील कुमार यांनी एन.सी.सी.च्या शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेसाठी असलेल्या महत्त्वावर प्रकाश टाकला. 

कार्यक्रमाचे आयोजन लेफ्टनंट उज्ज्वला सिरसाट, लेफ्टनंट दारासिंग राठोड  व भूतपूर्व पदधारक कॅडेट यांच्या द्वारे करण्यात आले. याप्रसंगी सीनिअर अंडर ऑफिसर यश तायडे, ज्युनियर अंडर ऑफिसर अनघा अवचार व ज्युनियर अंडर ऑफिसर अथर्व नानोटे या व इतर कॅडेट्सना त्यांचे नवीन पदभार प्रदान करण्यात आले. या समारंभाला एकूण ६० कॅडेट्स  उपस्थित होते. या अतिशय प्रेरणादायी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोहित जाधव यानी केले.

Post a Comment

0 Comments