Ticker

6/recent/ticker-posts

बुलढाणेकरांची पाडवा पहाट ठरली मंगलमय




बुलढाणा - दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी  वसंतलक्ष्मी एज्युकेशनल अँड मल्टिपर्पज फाउंडेशन या संस्थेद्वारे आयोजित केलेल्या 'चैत्र पाडवा पहाट' या कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सुप्रसिद्ध गायक राजेश दुतंडे व वाचस्पती चंदेल यांच्या संचाने सुमधुर गीतांचे सादरीकरण करुन बुलढाणेकरांची पाडवा पहाट प्रसन्न व संस्मरणीय केली.

            येथील वसंतलक्ष्मी एज्युकेशनल अँड मल्टिपर्पज फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष  तुषार मोहन काचकुरे व नाट्यकर्मी पवन बाबरेकर हे मागील दोन वर्षांपासून चैत्र पाडवा पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. यंदा ३० मार्च रोजी एडेड हायस्कूलच्या प्रांगणात पहाटे साडेपाच वाजता सुप्रसिध्द गायक  राजेश दुतंडे व गायिका वाचस्पती चंदेल यांचा 'प्रभाती सूर नभी रंगती' हा सुमधूर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, शेतकरी नेते रविकांतजी तुपकर  यांच्याहस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर रंगलेल्या संगीत मैफलीत  एकाहून एक सुंदर भावभक्ती गीते, गझल व मराठी चित्रपट गिते सादर करण्यात आली. राजेश दुतंडे यांनी सादर केलेले विठ्ठल नामाचा रे टाहो या भक्तीगीताला आणि वाचस्पती चंदेल यांनी सादर केलेल्या केव्हा तरी पहाटे या गझलेला रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. निवेदक चंद्रशेखर जोशी यांनी सादर केलेले वासुदेव आला रे वासुदेव आला हे गीत व त्यावर आनंद संचेती यांनी सादर केलेले वासुदेवाच्या वेशभूषेतील नृत्य रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल तीन तास ही सुरांची मैफल रसिकांनी अनुभवली. दरम्यान स्थानिकांपैकी जेष्ठ गायक अनंताभाऊ देशपांडे यांनीही अप्रतिम गीत सादर केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात गायक राजेश दुतंडे, गायिका वाचस्पती चंदेल, यांच्यासह वाद्यवृंदातील बासरीवादक आशिष उमाळे, ऑक्टोपॅड गणेश भालतिलक, सिंथेसाईजर श्रीकांत ढवळे, तबला वादक गजानन जवंजाळ , मृदंग वादक माधव आंधळे, ध्वनी संयोजक बजरंगभाऊ, निवेदक चंद्रशेखर जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्रीकृष्णजी जेऊघाले, किशोरजी गायकवाड, डी. एस. लहाने, गजाननजी राऊत, डॉ. दुर्गासिंग जाधव, निखिलजी श्रीवास्तव, डॉ. शोन चिंचोले, संदिपजी अग्रवाल, अरविंद पवार सर, गणेशसिंग जाधव यांच्यासह एडेड हायस्कूल परिवाराने विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप शाहीर सज्जनसिंग राजपूत यांच्या महाराष्ट्र गीताने करण्यात आला. पवन बाबरेकर यांनी केलेली कलात्मक नेपथ्य रचना, सेल्फी पाॅईंट , अंजली परांजपे यांनी विवेक शलाका या दैनंदिनीचे सर्व रसिकांना केलेले मोफत वितरण व सतीश रदाळ यांनी रसिकांना दिलेला कुल्हडमधील विशिष्ट चवीचा नागोरी चहा हे या कार्यक्रमाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले. 

      कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून तुषार काचकुरे यांनी  कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली व प्रचंड अशा उपस्थितीबद्दल रसिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

सूत्रसंचालन शशिकांत इंगळे यांनी केले तर डॉ. स्वप्नील दांदडे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी रविकिरण टाकळकर, दिनेश पाटील, राहुल चव्हाण, श्रीराम पुराणिक,लक्ष्मीकांत गोंदकर, पंजाबराव आखाडे, गणेश बंगाळे,विजय सोनोने, प्रसाद दामले, जयंत दलाल, गणेश राणे,  योगेश बांगडभट्टी, पराग काचकुरे, रणजित राजपूत अभिलश चोबे यांनी परीश्रम घेतले. 

        कार्यक्रमाला सौ.जयश्रीताई शेळके, एडेड हायस्कुलचे संचालक बाबासाहेब महाजन, तुषार महाजन यांच्यासह अरविंद टाकळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, मुख्याधिकारी गणेश पांडे, डॉ. गणेश गायकवाड, उद्योजक श्री.राजेशजी देशलहरा , डॉ. गजेंद्र निकम, पत्रकार अरुन जैन, राजेश डिडोळकर, राजेंद्र काळे, डॉ. अशोक भवटे, डॉ. सुभाष जोशी, सौ. अंजली परांजपे, डॉ. माधवी जवरे, सुरेखा खोत, सौ. अर्चना देव, डॉ. आशिष खासबागे, डॉ. अस्मिता चिंचोले, शाहिनाताई पठाण, डॉ. अर्चना वानेरे, प्रज्ञाताई लांजेवार, डॉ. मधुकर देवकर, डॉ. राहुल भालेकर, डॉ. गोफणे, डॉ. गवळी, ॲड. सौ. शर्वरी तुपकर, राजेश हेलगे, अरुण दिवटे, डॉ. सुभाष जोशी, डॉ. श्रीराम जोशी, संजिवनी शेळके, नमिता सावजी, डॉ. स्मिता गोडे, संदिप वानखेडे, श्रीहरी ठोसर, स्नेहलता मानकर, डॉ. अजित शिरसाट, डॉ. राजेश्वर उबरहंडे, रवी लहाने,शीतल सोनुने, डॉ. राहुल बाहेकर, अण्णासाहेब जाधव, गजेंद्रसिंग राजपूत, प्रा. प्रकाशचंद पाठक, सौ. वैशाली राजपूत, चित्राताई हिंगणे, मिलिंद आपटे यांच्यासह बुलढाणेकर नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments