शंकर जोगी/ विदर्भदूत वृत्त
अकोला:छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला महाराजांचे "व्हॉट्सॲप" वर स्टेट्स ठेवले म्हणून दोन युवकांना बेदम मारहाण प्रकरण शिवसेना जिल्हा अध्यक्ष श्रीरंग पिंजरकर यांची 'एन्टी' होताच ठाणेदार गोपाल ढोलेची एस.पी.बच्चन सिंग यांनी "उचलबांगडी" केली असून उरल पोलिस ठाण्याचा तात्पुरता प्रभार ए.पी.आय.अंधारे यांना देण्यात आला आहे,तर ठाणेदार गोपाल ढोले यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी अकोट येथील सहाय्यक पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्याकडे देण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील लोहारा येथील दोन युवकांना शिवाजी महाराजांचे स्टेटस ठेवले म्हणून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवसेना जिल्हाध्यक्ष श्रीरंग पिंजरकर यांनी शनिवारी (दि.२२ मार्च) लोहारा येथे भेट देऊन मारहाणग्रस्त युवक आणि त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गोपाल ढोले यांनी पक्षपातीपणे कारवाई करून निर्दोष युवकांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करत त्यांनी गोपाल ढोले यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्याकडे केलेली आहे.
पोलीस प्रशासनाने एका गटाला अभय देऊन दुसऱ्या गटावर अन्याय केल्याचाही आरोप पोलिसांवर केल्या जात आहे. जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांनी प्रशासनाला इशारा देत जर संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.निष्पक्षपाती कारवाई झाली नाही आणि शांतता भंग झाल्यास त्यास पोलीस प्रशासन जबाबदार असेल असेही सांगण्यात आले आहे. लोहारा गावात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चा देखील लोहारा गावातील लोकांनी आणला होता.
गावकऱ्यांच्या माहितीनुसार,२१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पोलिसांनी दोन युवकांना घरातून उचलले. त्यांना उरळ येथे नेत असताना आरामशीन परिसरात एकांतात नेऊन "पट्टे व दंडुक्या"ने बेदम मारहाण करण्यात आली आहे. याशिवाय "तुमच्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकू" अशी धमकीही देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.जिल्ह्यात पोलिस प्रशासनावर वरिष्ठ अधिकारी वर्गाचा अंकुश नसल्याने अधिकारी व कर्मचारी मनमानीपणे वागत असल्याने पोलिस विभागाची "नाचक्की" होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात घडत असलेल्या "खून,मारामाऱ्या व लूटमारी"च्या घटनांवरून ही सिद्ध देखील झाले आहे.
लोहारा येथील निष्पाप युवकांना महाराज झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी उपजिल्हा प्रमुख संतोष अनासने,बाळापूर उपजिल्हा प्रमुख उमेश आप्पा भुसारी, जिल्हा सचिव सतीश गोपनारायण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शंकर जोगी,
बाळापूर तालुका प्रमुख मंगेश म्हैसने, तालुका संघटक रमेश थुकेकर, उपशहर प्रमुख स्वप्नील देशमुख, विधानसभा प्रमुख अमोल खुलेकर यासह शकडो शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते.
युवकांना बेदम केली असल्याचे उत्पन्न झाल्यास, विनाकारण बेदम महान करणारा ठाणेदार गोपाल ढोले यांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही असे प्रतिक्रिया अकोला जिल्हाध्यक्ष श्रीरंग पिंजरकर यांनी यावेळी दिली.
0 Comments