अकोला: समाजात भीती घालणारे लोक भरपूर भेटतील, पण धाडस शिकविणारे लोक कमी भेटतील. भीती हा सर्वात मोठा आजार आहे, धाडस हा उपाय आहे. डोक्यात आलेला आजार हा शरीरात उतरतो, त्यामुळे डोक्यात आजारांची गाठ बांधू नका, यासोबत नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या, आजार यावर तात्काळ करता येणारे उपाय घरीच करावेत असे प्रतिपादन राष्टीय पारीतोषीक विजेते सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर यांनी केले.
दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला, राजीविन सोलर यांच्या संयुक्त विद्यामाने रविवार 2 मार्च रोजी श्री राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल विज्ञान महाविद्यालय येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते औषधाविना आरोग्य या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंग मोहता, डॉ. पवन माहेश्वरी,आरएलटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश चंद्रवंशी, बालमुकुंद भिरड, सिमरन नागरा, ज्ञानेश साबळे, जेष्ठ कवी बापूराव झटाले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक मनसे जिल्हाध्यक्ष व संचालक पंकज साबळे यांनी प्रस्ताविकेतून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. आयुष्य आनंदात जगायचे, रडणाऱ्यांना कोणी विचारत नाही, हासत खेळत जगणाऱ्यांना लोक विचारतात, जगताना अधू म्हणून जगू नका, हिंमतीने जगा, हिम्मत असेल तरच किंमत आहे, आनंदाने जगण्यासाठी कोणताही पैसा लागत नाही, मात्र रुग्णालयात पैसा लागतो. औषधविना जगायचे असेल तर औषधे बाजूला सारून निसर्गोपचार करणे आवश्यक आहे, त्याकरिता शरीराचे शुद्धीकरण करून घेणे आवश्यक आहे, शरीरातील घाण बाहेर पडक्यास शरीर रोगमुक्त राहते, नागरिकांच्या सदृढ आरोग्य व निसर्गदायी जीवनासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करावा असेही ते पुढे बोलताना म्हणाले. तर नागरिकांनी सदृढ आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य आहार व व्यायाम करावा असे मत अध्यक्षीय भाषणात ऍड. मोतिसिंह मोहता यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवाजी भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाम देशमुख, सौरभ भगत, प्रायांक बालोदे, पंकज देशमुख, प्रदीप मुस्तद, गौरव देशमुख आदींनी पुढाकार घेतला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शिवगौरव पुरस्काराने सन्मानित !
याप्रकरणी मंचावर असलेल्या मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा शिवगौरव पुरस्कार देण्यात आला. मुकबधिरांसाठी कार्ये करणारे पंकज जायले, वंचितांची दिवाळी साजरी करणारे पुरुषोत्तम शिंदे, युवा उद्योजक सिद्धार्थ रुहाटिया, युवा उद्योजक मधुर इनांनी, युवा समाजसेवक कमलजीत कौर, केल्विन सुबी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.
0 Comments