Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीला रस्त्यात गाठून प्रपोज करणाऱ्या आरोपीला ३ वर्षांची जेल

 


शंकर जोगी-अकोला: जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील ग्रामीण पोलिस स्टेशनला २९१९ साली दाखल झालेल्या एका प्रकरणांत,१५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीचा पाठलाग करून "तु मला खूप आवडतेस,मी तुझ्यावर प्रेम करतो" असे म्हणणा-या आरोपीला ३ वर्षे कठोर कारावासाची शिक्षा व १०,००० रुपये दंड असा आदेश अकोट सत्र न्यायालयाने सुनावला आहे.

     राज्यात सर्वत्र तरुण,अल्पवयीन इतकेच काय तर ८० वर्षे वय असलेल्या म्हाताऱ्या महिलेला देखील या समाजात जगणे मुश्किल झाले असून केव्हा कुठे कोण काय करेल याचा काहीच नेम राहिलेला नाही.

     केंद्रात मंत्री असलेल्या रक्षा खडसे यांच्या मुलीची सोबत सुरक्षा रक्षक असताना सुद्धा मुक्ताईनगरच्या यात्रेत टपोरी पोरांनी छेड  काढून त्रास दिल्याच्या घटनेला अजून पुरते दोन दिवस देखील झालेले नाहीत.केंद्रात मंत्री असलेल्या "पॉवर फुल्ल" मंत्र्यांची मुलेही जर का या राज्यात सुरक्षित नाहीत,तर सर्वसामान्य लोकांच्या मुलींचे काय.? असाच प्रश्न आज सत्ताधाऱ्यांना विचारल्या जात आहे.अशाप्रकारच्या घटना सतत घडत असल्याने राज्यात चाललेय तरी काय.? असे म्हणण्याची वेळ या राज्यातील जनतेवर आलेल्या आहे.

शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे एकटे दूकटे बाहेर निघणेही मुश्किल झालेले आहे.सर्वत्र महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत वाढ होत असल्याने मुलींना पुढे शिकवायचे की नाही असा यक्ष प्रश्न त्यांच्या पालकांच्या पुढे उभा ठाकला  आहे. 

सत्ताधारी व राज्यकर्त्यांना जरी ह्या विषयांवर काही देणे घेणे वा काहीच सोयर सुतक नसले तरी राज्यातील न्याय व्यवस्थेने मात्र आपली समाजा प्रती असलेल्या बांधिलकी सोडली नाही. त्यांच्यापुढे आलेल्या प्रत्येकच प्रकरणांत पीडित महिला मुलींना न्याय दिला जाईल अशाच पद्धतीने प्रकरणे गांभीर्याने चालवून अशा प्रकरणांतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिल्या जात आहे.

या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, १५ वर्षीय शाळेमध्ये जाणा-या अल्पवयीन  विद्यार्थीनीने आरोपी दिपक सावरकरचे विरूध्द ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की,ती दररोज शाळेत अकोट येथे जाण्याकरिता बस स्टँडवर आली की आरोपी दिपक तिचे मागेमागे बस स्टँडवर वर येतो व पिडीता अकोटला जाई पर्यंत बस स्टँडला उभा राहून तिचेकडे एक टक पाहतो.ही बाब पीडीतेने तिच्या आईवडिलांना सांगितली होती.तेव्हा पीडीत मुलीच्या वडीलांनी आरोपीला समजावून सांगितले होते तरी सुध्दा तो नेहमीच पीडीत मुलीचा पाठलाग करीत असे. दि. ०२.०५.२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजताचे दरम्यान पीडीता तिचे काकाचे घरी जात असतांना आरोपी दिपक सावरकर हा तिचे मागे आला व तिचे जवळ येवून म्हणाला की, "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तु मला खूप आवडतेस". असे म्हणून तो तिथून निघून गेला. पीडीतेने घरी जावून आई वडीलांना ही गोष्ट सांगितली व वडीलांसोबत येवून वरील प्रमाणे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल  केली. 

   त्या पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला व या गुन्ह्याचे प्राथमिक तपास अधिकारी पीएसआय शहाजी रूपनर व तपास अधिकारी पीएसआय सुवर्णा गोसावी यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले. या प्रकरणात सरकारी वकील  अजित देशमूख यांनी अल्पवयीन पीडीत मुलगी तिचे वडील एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असे एकूण ६ साक्षीदारांच्या या प्रकरणात नोंदवल्या. तसेच, न्यायालयात आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द झाल्यानंतर सरकारी वकील अजित देशमूख यांनी शिक्षेसंबंधी युक्तीवाद केला की, अल्पवयीन विद्यार्थीनींना विनयभंग तसेच लैगिंग अपराध या समस्येला बरेचदा समोर जावे लागते व ही प्रकरण राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकरणात आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द झाला आहे त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या इतर अपराधांना वचक बसावा व समाजात तसा संदेश जावा या उद्देशाने या आरोपीला जास्तीत जास्त कठोर कारावासाची शिक्षा दंडासह देण्यात यावी व दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर विद्यमान कोर्टाने आरोपी दिपक सावरकरला वरीलप्रमाणे ३ वर्ष कठोर कारावासाची शिक्षा १०,००० रुपये दंडासह ठोठावली.

Post a Comment

0 Comments