Ticker

6/recent/ticker-posts

महापुरुषांचे स्टेटस ठेवणे चुकीचे नाही, युवकांना बेदम महान करणे हे पोलिसांचे नाकर्तेपणा-श्रीरंगदादा पिंजकर

 


शंकर जोगी - विदर्भदूत वृत्त

अकोला: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी क्रांतीची मशाल ज्वलंत ठेवली अशा थोर महापुरुषांचे स्टेटस ठेवणे हे चुकीचे असेल व याला आक्षपार्य स्टेटस म्हणून स्टेटस ठेवणाऱ्या युवकांना पोलिसाकडून व बेदम मारहाण होत असेल तर हे पोलीस प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. ही बाब शिवसेना कधीही खपवून घेणार नाही. अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाध्यक्ष श्रीरंगदादा पिंजरकर यांनी व्यक्त केली.

    उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोहारा येथील दोन युवकांनी सदर स्टेटस ठेवल्यामुळे त्यांना येथील ठाणेदार गोपाल ढाले यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज  शुक्रवार दि. २१ मार्च रोजी घडली. लोहारा  येथील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीरंग दादा यांना सदर माहिती दिली असता श्रीरंग पिंजरकर यांच्या यांच्या निदेशानुसार  जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचा ताफा एस पी करायला येते धडकला व येथे आंदोलन छेडण्यात आले. याबाबत पोलीस अधीक्षक बच्चनची यांना याबाबत विचारणा करून सदर ठाणेदार गोपाल झाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे मागणी केली.

यावेळी शिवसेना जिल्हा सचिव सतीश गोपनारायण , उप शहर प्रमुख स्वप्नील देशमुख , मंगेश घावट ,उप जिल्हा प्रमुख सुरेश ठाकरे , विधानसभा प्रमुख संजय रोहनकार , तालुका प्रमुख,विजय वानखडे, तालुका प्रमुख प्रकाश गीते , तालुका प्रमुख मंगेशम्हैसने,तालुकाप्रमुख,बालूभाऊ बगाडे ,तालुका संघटक रमेश थुकेकर ,  सैनिक आघाडी ग्रामीण चे अध्यक्ष प्रकाश इंगळे, बाळापूर विधानसभा संघटक उत्तम डुकरे, युवा सेना शहर प्रमुख,विक्की बावरी, शहर संघटक राजू पिंजरकर, उप शहर प्रमुख स्वप्नील देशमुख , उप तालुका प्रमुख सागर अवारे ,  सर्कल प्रमुख महादेव ठाकरे,  सर्कल प्रमुख प्रशांत गावंडे , योगेश कंडारकर, प्रशांत घाटोड, महेश वगैरे, सुरेश खडे, राजेंद्र खंडारे, सागर राठोड, गजानन डाबेराव, कैलास उमाळे, तेजराव वकटे, अतुल पंडुकले पंकज बाजड, यासह लोहारा गावातील शकडो शिवसैनिक उपस्थित होते. अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शंकर जोगी यांनी दिली.

याप्रकरणी श्रीरंगदादा पिंजरकर यांनी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हा तपास  अकोटचे एचडीपीओ अमोल मित्तल यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला .

Post a Comment

0 Comments