शिवसेना जिल्हा कार्यालयात शिवजयंती उत्साहात..!
शंकर जोगी-दि.18मार्च./ विदर्भेदूत वृत्त
अकोला: छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच, महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या सरसावत आहे .एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात, जगण्यात वसतात. शून्यातून स्वराज्य उभारुन नवा इतिहास रचणाऱ्या शिवरायांनी दाखवून दिलेल्या मार्गावरुन चालण्याचा निश्चय करुया. शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करताना समाजातील सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेतले होते.असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा अध्यक्ष श्रीरंगदादा पिंजरकर यांनी केले
स्थानिक नेहरु पार्क चौकातील शिवसेना जिल्हा कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते .
प्रमुख उपस्थितीमध्ये बादलसिंग ठाकूर, गजानन पावसाळे, व इतर पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पूजन करण्यात केले . याप्रसंगी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकत्यांनी श्रीरंग पिंजरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले,
या कार्यक्रमात जिल्हा संघटक बादलसिंग ठाकूर ,जिल्हा समन्वयक गजानन पावसाळे,उप जिल्हा प्रमुख गोपाल म्हैसने,उप जिल्हा प्रमुख उमेश अप्पा भुसारी , उप जिल्हा प्रमुख सुरेश ठाकरे , जिल्हा सरचिटणीस अनंतराव वाकोडे, जिल्हा सचिव सतिश गोपणारायन ,विधानसभा प्रमुख संजय रोहनकार , तालुका प्रमुख,विजय वानखडे, तालुका प्रमुख प्रकाश गीते , तालुका प्रमुखमंगेशम्हैसने,तालुकाप्रमुख,बालूभाऊ
बगाडे ,तालुका संघटक रमेश थुकेकर , सैनिक आघाडी ग्रामीण चे अध्यक्ष प्रकाश इंगळे, बाळापूर विधानसभा संघटक उत्तम डुकरे, युवा सेना शहर प्रमुख,विक्की बावरी, शहर संघटक राजू पिंजरकर, उप शहर प्रमुख स्वप्नील देशमुख , उप तालुका प्रमुख सागर अवारे , सर्कल प्रमुख महादेव ठाकरे, सर्कल प्रमुख प्रशांत गावंडे , योगेश कंडारकर, प्रशांत घाटोड, महेश वगैरे, सुरेश खडे, राजेंद्र खंडारे, सागर राठोड, गजानन डाबेराव, कैलास उमाळे, तेजराव वकटे, अतुल पंडुकले, पंकज बाजड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments