Ticker

6/recent/ticker-posts

रोजा म्हणजे तहान, भूक विसरणे नव्हे शारिरीक अवयवांवर नियंत्रण मिळवणे -डॉ सय्यद रफिक पारनेरकर

 


बुलडाणा, रोजा म्हणजे तळागाळातील कफल्लक, भणंग, बिनचेहऱ्याच्या माणसाच्या तहानभुकेची जाणीव श्रीमंतांना, धनिकांना व्हावी, त्यांच्या पदरात पडलेलं उपेक्षेचे जीणे महिनाभर कळकळ उपवास धरून अनुभवता यावे, रोजा फक्त तहान आणि भुकेपर्यंत मर्यादित नसतो, रोजा जिभेचा असतो, डोळ्यांचा असतो, कानांचा असतो, हातापायाचा असतो, जिभेने वाईट बोलायचे नसते, कोणाची निंदानालस्ती करायची नसते, कानांनी चहाळक्या ऐकायच्या नसतात, कोणावर विनाकारण हात उगारायचा नसतो, वाईट ठिकाणांच्या रोखाने पाय वळणार नाही याची दक्षता घ्यायची असते असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते, इस्लामधर्माचे प्रगाढ अभ्यासक डॉ सैय्यद पारनेरकर यांनी केले

           सामाजिक ऐक्याचे बाहू बळकट करण्यासाठी कृतीशीलतेच्या पातळीवर राज्यभर सदैव अग्रेसर असणाऱ्या बुलडाणा अर्बन आणि सहकार वि‌द्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 19 मार्च पवित्र रमजान महिन्याच्या मंगलपर्वावर दावते इफ्तारचे सहकार विद्यामंदिर ऑडिटोरियम मध्ये भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते, दावेते इफ्तार समारंभाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष  राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी होते, प्रमुख अतिथी  बुलडाणा अर्बनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ सुकेश झंवर, सहकार वि‌द्या मंदिराच्या अध्यक्षा सौ कोमलताई झंवर-  चांडक, स्टेट बँक ऑफ इंडिया डिस्टिक हेड इक्बाल अहेमद होते,प्रास्ताविकपर मनोगतात बुलडाणा अर्बनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ सुकेश झंवर म्हणाले की सर्वधर्मीयांच्या उत्सवात सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा समष्टीपूर्ण कित्ता बुलडाणा अर्बन आजतागायत निष्ठेने, भक्तीने गिरवीत आहे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शिख, सर्वधर्मीयांच्या सणावारात बुलडाणा अर्बन उत्साहाचे रंग भरत आली आहे, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, , आंध प्रदेश देशाच्या या ३ राज्यात बुलडाणा अर्बनचा डोलारा पसरला असून देशाचे 8 राज्य बुलडाणा अर्बनचे कार्यक्षेत्र आहे, बुलडाणा, अकोला, जळगाव या तीन जिल्ह्यात सहकार विद्यामंदिर विद्यादानाचे पवित्रकार्य करत आहे, 24 हजार कोटींची उलाढाल असलेल्या बुलडाणा अर्बनचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य सर्वश्रुत आहे, अनेक विधायक कार्याच्या उतरंडी रचत बुलडाणा अर्बनची वाटचाल दिमाखदारपणे सुरू आहे,

इस्लाम धर्मातला पवित्र महिना रमजान आणि या रमजान महिन्यात धरल्या जाणाऱ्या 30 कडकडीत उपवासाचे महत्व विशद करतांना डॉ सैय्यद रफीक पारनेरकर पुढे म्हणाले की, रमजान या पवित्र मासात अल्लाह रब्बूल इज्जतने पैगंबरे आखिरुजजमां हजरत मोहम्मद सललल्लाहो व अलैह वसल्लम यांच्यावर आकाशी ग्रंथ फुरकाने हमीद, कुरआने मजीद उतरविला, पवित्र कुरआन फक्त मुस्लिमांसाठी नसून सकल मानवजातीच्या सर्वकष कल्याणासाठी आहे, कुरआनच्या केंद्रस्थानी फक्त माणूस आहे, बुलडाणा अर्बनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल यावेळी जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीनेडॉ सुकेश झंवर यांचा भव्यदिव्य सामूहिक सत्कार करण्यात आला,

बुलडाणा अर्बनने घेतली 43 वर्षीय अमोघ वक्तृत्वयात्रेची मनस्वी नोंद....

वक्तृत्वाच्या, निवेदनाच्या, सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात 43 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रख्यात मराठी कवी, नामवंत वक्ते, निवेदक अजीम नवाज राही यांचा बुलडाणा अर्बनच्या वतीने बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ सुकेश झंवर आणि सहकार विद्या मंदिराच्या अध्यक्षा सौ कोमलताई झंवर- चांडक यांनी सत्कार केला, दावते इफ्तारला बुलडाणा शहरातील आणि जिल्ह्यातील रोजदार मुस्लिम बांधवांची उपस्थिती भरगच्च होती, दावते इफ्तारनंतर नमाजे मगरीब अदा करण्याची व्यवस्था भलामोठा शामियाना थाटून बुलडाणा अर्बनने सहकार विद्या मंदिराच्या प्रांगणात केली होती, दावते इफ्तार समारंभाचे उर्दू, मराठी, हिंदी मिश्रीत बहारदार सूत्रसंचलन अजीम नवाज राही यांनी खास आपल्या शैलीत केले.

Post a Comment

0 Comments