Ticker

6/recent/ticker-posts

सर्वसामान्यांचा असामान्य नेता आमदार अमितदादा झनक

 


शंकर जोगी-अकोला: आज रिसोड – मालेगांव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय युवा आमदार अमितदादा झनक यांचा वाढदिवस म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांचा आनंद सोहळाच म्हणावा लागेल. त्याला कारणही तसेच आहे, अमितदादा म्हणजे असंख्य कार्यकर्त्यांचे स्फूर्तिस्थान आहे. त्यांनी आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते नुसते तयार केले नाहीत, तर त्यांना राजकीय प्रवाहात आणून त्यांचे उत्थान करण्याचे कामही आ.अमितदादा झनक यांनी केले आहे. म्हणूनच तर त्यांच्या अवती भोवती कार्यकर्त्यांचा गराडा कायम असतो. ” कार्यकर्ता हीच माझी ताकद, कार्यकर्ता हीच माझी शक्ती ” असे मानणारे आ. झनक साहेब यांची जनसामान्यांच्या समस्या सोडविण्याची तळमळ नेहमीच दिसून येते. म्हणूनच त्यांना सर्वसामान्यांचा असामान्य नेता म्हणून ओळखले जाते. अशा या कर्तृत्ववान नेतृत्वाचा वाढदिवस म्हणजे आमचा आनंद सोहळाच..!

गेल्या अनेक वर्षांपासून आमदार अमितदादा झनक यांच्याबरोबर त्यांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. कारण आ. झनक साहेब यांच्या सहवासात असताना त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनाचे अनेक पैलू मला जवळून अनुभवता आले.

आमदार अमितदादा झनक म्हणजे लोहचुंबकासारखे व्यक्तिमत्त्व आहे. अभ्यासूवृत्ती, अफाट आकलनशक्ती लाभलेल्या या नेतृत्वाचा आणखी एक विशेष गुण म्हणजे सर्वांना आपलेसे करून सांभाळून घेत कोणाचेही मन न दुःखवता सर्वांना समान संधी देणे हा होय. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात आलेला प्रत्येक व्यक्ती लोहचुंबकाप्रमाने त्यांच्याकडे आकृष्ट होऊन त्यांचा निष्ठावान कार्यकर्ता बनतो. हा माझा स्वानुभव आहे. अमितदादा झनक यांच्या राजकीय जीवनाचा विशेष पैलू म्हणजे ते आपले मत मांडताना अत्यंत ठाम असतात. बोलण्यापूर्वी विचार करणे, विषयाचा अभ्यास करून त्यातील बारकावे शोधणे हे त्यांचे गुण कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरतात. नुसताच आवाज चढवून भाषण करणे योग्य नाही, तर आपल्या भाषणातून समाजात विचार गेले पाहिजेत. आवाजाची उंची नाही, तर विचारांची उंची वाढली पाहिजे असे आमदार झनक साहेब नेहमी सांगतात. राजकारणात आणि सामाजिक जीवनात वावरतांना ते सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. म्हणूनच स्वपक्षीय तसेच विरोधी पक्षातील कार्यकर्ते, नेतेमंडळीबरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध टिकून आहेत. परिणामी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे अमितदादा झनक यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आहे. हे रिसोड – मालेगांव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेने सुद्धा मान्य केले आहे. त्यामुळेच आमचे नेते आ. अमितदादा झनक यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या विजयाचा सणसणीत चौकार ठोकून सर्वसामान्यांचा असामान्य नेता असल्याचे सिद्ध केले आहे. अशा या कर्तृत्ववान, प्रतिभावान, कृतिशील विचारांच्या सर्वसामान्य लोकमान्य नेतृत्वास आई तुळजा भवानी दिर्घ व निरोगी आयुष्य देवो..! या सदिच्छांसह आ. अमितदादा झनक यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!!

Post a Comment

0 Comments