शंकर जोगी अकोला: अकोल्याचा सुपुत्र आणि विदर्भाच्या क्रिकेट क्षेत्रातील चमकता तारा अथर्व ययाती तायडे आपल्या सातत्यापूर्ण दमदार खेळीमुळे आता आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणार आहे. अथर्व ने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम मोडीत काढत भारतीय क्रिकेट क्षेत्रामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने 2024 च्या आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना दोन अर्धशतके झळकावली होती. त्यामुळे अकोल्याच्या या युवा खेळाडूकडे अनेक संघाचे लक्ष लागलेले होते.
श्रीलंका अंडर 19 संघाविरुद्ध सलग दोन शतके झळकावणाऱ्या अथर्वने भारतीय अंडर 19 क्रिकेटमधील सर्वात जलद शतक ठोकले होते. त्याचबरोबर जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक करणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला होता. 2018 मध्ये कुछ बिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेश संघाविरुद्ध 320 धावा ठोकून विदर्भाला पहिल्यांदाच विजेते पद मिळवून दिले होते. अथर्वचा हा पराक्रम विदर्भाच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला आहे. अथर्वची काही नेत्र दीपक कामगिरी पुढील प्रमाणे सांगता येईल.
यशस्वी कर्णधार.... विजेतेपदाची मालिका 2014..... अंडर 14 राजसिंह डुंगरपुर ट्रॉफी यात विजेतेपद मिळविले. सन 2018.. अंडर 19 कुछ बिहार ट्रॉफी 2020..... अंडर 23 कर्नल सी के नायडू ट्रॉफी मिळविली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील योगदान.. आशिया कप खेळला यात अथर्वचा संघ उपविजेता ठरला 2018 मध्ये भारत यू 19 संघातून आशिया कप खेळला. यात अथर्वचा संघ उपविजेता ठरला. इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी... लेक्स्टर क्रिकेट क्लब कडून खेळताना सर्वाधिक 1160 धावा आणि 83 विकेट्स घेऊन अथर्वने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन घडविले होते. विदर्भाच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका. 2019 मध्ये रणजी आणि इराणी ट्रॉफी जिंकणाऱ्या विदर्भ संघाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अथर्व होता. 2024... 25 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या विजयि विदर्भ संघाचा.. प्रमुख खेळाडू अथर्व होता
आयपीएल 2025 मध्ये अथर्वने मोठी झेप घेतली. 2024 च्या आयपीएल मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघात खेळताना दोन अर्धशतकीय झळकावणाऱ्या अथर्वने सर्वांना आपली प्रतिभा दाखवून दिली होती. त्याच्या या कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2025 साठी त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे. अथर्वच्या या नव्या प्रवासासाठी अकोला आणि संपूर्ण विदर्भातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Comments