बुलढाणा- मराठी नववर्षाची सुरेल सुरुवात चैत्र पाडवा पहाट प्रभाती सूर नभी रंगती या भक्तीगीत, भावगीत, अभंग, मराठी चित्रपट गीतांच्या दर्जेदार मैफिलीने होणार आहे. चैत्र शुद्ध पाडवा म्हणजेच गुढीपाडव्यापासून नवीन मराठी वर्षाची सुरुवात होते. या निमित्ताने वसंतलक्ष्मी मल्टीपर्पज फाउंडेशन व मित्र परिवाराच्यावतीने दि. ३० मार्च रविवारी पहाटे ०५.३० वाजता चैत्र पाडवा पहाटचे आयोजन एडेड हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षापासून बुलढाण्यातील वसंतलक्ष्मी मल्टीपर्पज फाउंडेशन व मित्र परिवाराच्यावतीने या पहाट पाडव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुप्रसिद्ध गायक राजेश दुतंडे व वाचस्पती चंदेल यांच्या बहारदार गीतांनी पहाट पाडवा रंगणार आहे.या मैफलीसाठी सिंथेसाईजर- श्रीकांत ढवळे, तबला- गजानन जवंजाळ, मृदंग- माधव आंधळे,बासरी- आशिष उमाळे, ऑक्टोपॅड -गणेश भालतिलक,ध्वनिसंयोजन- बजरंगभाऊ यांची साथ रंगत असणार आहे या प्रभाते सूर नभी रंगती कार्यक्रमाचे निवेदन चंद्रशेखर जोशी करणार आहेत. या कार्यक्रमासाठी बुलढाणा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक तुषार काचकुरे ,पवन बाबरेकर यांचेसह
दिनेश पाटील,शशिकांत इंगळे,आनंद संचेती,राहुल चव्हाण,श्रीराम पुराणिक,पंजाबराव आखाडे,विजय सोनोने, स्वप्निल दांदडे,प्रसाद दामले,अरविंद पवार,गणेश बंगाळे,जयंत दलाल,संतोष पाटील,विलास मानवतकर,गणेश राणे,लक्ष्मीकांत गोंदकर,योगेश बांगडबट्टी,पराग काचकुरे,सतिष रदाळ,रणजीत राजपूत आयोजन समितीतील या सदस्यांनी केले आहे.
0 Comments