Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय सेवा सदनची उदात्त हेतूंना हरताळ ! शिक्षणप्रेमी राधादेवींचा आत्मा ढाळत असेल अश्रू



अकोला - क्रांतीज्योती सावित्रीबाई,राष्ट्रमाता जिजाऊ यांची प्रेरणा घेत शिक्षणप्रेमी राधादेवी गोयनका यांनी ज्या उदात्त हेतूने भारतीय सेवा सदनची मुहूर्तमेढ रोवली ,त्याच संस्थेत त्यांच्या तिसऱ्या पिढीने व्यावसायिक हैदोस घालायला सुरुवात केली असून मराठी शाळेला कुलूप लावत  पब्लिक स्कुलच्या नावाखाली खोऱ्याने पैसा ओढण्याचे उद्योग सुरु केल्याने या संस्थेतील अनेक विश्वस्तांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. 

     स्वातंत्र्यपूर्व काळात अकोल्यात महिलांच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी या उदात्त हेतूने दिवंगत राधादेवी गोयनका यांनी भारतीय सेवा सदन या संस्थेची स्थापना करीत महिला महाविद्यालयाची सुरुवात केली. त्याकाळी या सुधारणावादी कार्याला मदत व्हावी म्हणून सरकारने मोफत चाळीस एकरवर जागा दिली. वऱ्हाडात स्त्री शिक्षणाला सुरुवात करण्यात ज्या संस्थेचा मोठा वाट होता आता त्याच संस्थेत या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम सुरु झाल्याने या संस्थेतील अनेक विश्वस्तांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली आहे. राधादेवी गोयनका यांच्यानंतर त्यांचे पुत्र दिलीपराज गोयनका यांच्या हातात संस्थेची सूत्रे गेल्यावर मनमानी कारभानेराने डोके वर काढले असून त्याला विरोध करणाऱ्या सात लोकांना या महाशयांनी विश्वस्त मंडळावरून कमी केल्याची माहिती असून आता या माजी  विश्वस्त मंडळींनी संस्थेत चाललेल्या  अनागोंदी कारभाराच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. सरकार कडून शेकडो कोटींची जमीन विनामूल्य पदरात पाडून सुद्धा मराठी शाळा बंद करून लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी सोन्याची कोंबडी ठरलेल्या आरडीजी पब्लिक स्कुलची उभारणी करीत सर्वाना शिक्षण या धोरणाला पद्धतशीर बाजूला ठेवण्याचे काम संस्थेकडून केले जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. संस्थेच्या गंगाजळीत असणाऱ्या कोट्यवधींच्या ठेवी,पब्लिक स्कुलचे मोठे उत्पन्न असताना सुद्धा या संस्थेने महापालिकेचा अडीच कोटी रुपयांचा कर थकविला असल्याची माहिती  पुढे आली आहे. 

कुटुंब रंगलंय संस्थेत 

भारतीय सेवा सदन या संस्थेची नियमावली इंग्रजकालीन असून त्या काळात शंभर रुपयात एक मताचा अधिकार विश्वस्तांना प्रदान केला आहे , प्रत्यक्षात स्वातंत्र्यानंतर हे नियम बाद झाले असतानाही या संस्थेत नियमबाह्य त्याचा वापर करीत एकेका सभासदाला शेकडो मते देण्याचा अमर्याद अधिकार असल्याचा दावा करीत सध्या गोयनका कुटुंबातील सदस्यांचा मोठा भरणा संस्थेत झाला आहे. यालाही आव्हान देण्याचा प्रयत्न माजी विश्वस्त करीत असल्याची माहिती आहे.

Post a Comment

0 Comments