शंकर जोगी/ विदर्भदूत वृत्त/ २८ मार्च
अकोला: थकीत कर धारकांकडून वसुली करण्याची मोहीम आता चांगलीच जोर धरत आहे आतापर्यंत महानगरपालिकेने कोट्यावधींचा कर वसुली त्याला असून मार्च अखेर कर वसुली पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून थकीत कर धारकांचे मालमत्ता सील करण्याची मोहीम सुरू आहे
या मोहीम अंतर्गत शिवर येथील एका मंगल कार्यालय कडे आठ लाखाच्या वर मालमत्ता थकीत असल्याने मनपा प्रशासनाने मालमत्ता सील करण्याच्या कारवाईचा बडगा उचलला. मात्र कारवाईच्या दरम्यान मालमत्ता धारक यांनी कारवाईत अडथळा आणून कर्मचाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा केली. यामुळे मनपा प्रशासनाने मालमत्ता धारक विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबात सविस्तर वृत्त असे की, शिवर येथील पुर्व झोन अंतर्गत वार्ड क्र. अे-10 मालमत्ता क्र. 613, दुर्गा माता मंगल कार्यालय यांच्या कडे सन 2017 ते 2025 पर्यंतचा एकुण मालमत्ता कर रूपये एकुण 8,66,192/- थकित असल्याने, 26 मार्च रोजी सिलची कार्यवाही करण्यास मनपाचे अधिकारी कर्मचारी गेले होते.
थकीत कर धारकांकडून वसुली करण्याची मोहीम आता चांगलीच जोर धरत आहे आतापर्यंत महानगरपालिकेने कोट्यावधींचा कर वसुली त्याला असून मार्च अखेर कर वसुली पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून थकीत कर धारकांचे मालमत्ता सील करण्याची मोहीम सुरू आहे
या मोहीम अंतर्गत शिवर येथील एका मंगल कार्यालय कडे आठ लाखाच्या वर मालमत्ता थकीत असल्याने मनपा प्रशासनाने मालमत्ता सील करण्याच्या कारवाईचा बडगा उचलला. मात्र कारवाईच्या दरम्यान मालमत्ता धारक यांनी कारवाईत अडथळा आणून कर्मचाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा केली. यामुळे मनपा प्रशासनाने मालमत्ता धारक विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबात सविस्तर वृत्त असे की, शिवर येथील पुर्व झोन अंतर्गत वार्ड क्र. अे-10 मालमत्ता क्र. 613, दुर्गा माता मंगल कार्यालय यांच्या कडे सन 2017 ते 2025 पर्यंतचा एकुण मालमत्ता कर रूपये एकुण 8,66,192/- थकित असल्याने, 26 मार्च रोजी सिलची कार्यवाही करण्यास मनपाचे अधिकारी कर्मचारी गेले होते.
मनपा पुर्व झोनचे सहाय्यक आयुक्त विजय पारतवार, सहायक अधिक्षक तथा जप्ती पथक प्रमुख राजेश सरप, सहायक कर अधीक्षक देवेंद्रकुमार भोजने, कर वसुली लिपिक प्रकाश थुकेकर, लिपिक प्रफुल हंबीर, शिपाई कृष्णराव वाकोडे व सुरक्षा रक्षक संगिता शिंदे यांचा पथकात समावेश होता.
कार्यवाही दरम्यान मालमत्ता धारक जगदिश मुरूमकार यांनी वाद निर्माण करून अधिका-यांशी अरेरावीची भाषा केली. तसेच वाद-विवाद करून सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. पथकाने ही बाब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. त्यामुळे मनपा उपायुक्त गीता ठाकरे तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख चंद्रशेखर इंगळे व त्यांची टिम घटनास्थळावर दाखल झाली. जगदीश मुरूमकार यांनी त्यांच्याशी देखील वाद केला. त्यामुळे अखेर विजय पारतवार यांनी जगदीश मुरूमकार यांचे विरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला थकित व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा वेळेच्या आत करून सील, जप्ती व लिलाव सारख्या अप्रिय कारवाई टाळून मनपा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाव्दारा केले आहे.
थकित करापोटी पुर्व, उत्तर आणि दक्षिण झोन येथील 5 मालमत्तांवर सीलची कारवाई
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा उपायुक्त गीता ठाकरे आणि कर अधिक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत शिवर येथील वार्ड क्रं. अे-10 मालमत्ता क्रं. 257 धा.प्रदीप/प्रशांत यांचेकडे 2022-23 पासून आज पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 2,93,382/- एवढा मालमत्ता कर थकित असल्याने त्यांच्या मालमत्तावर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई सहा.आयुक्त विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात झाली असून कारवाईत सहा.अधिक्षक तथा पथक प्रमुख राजेश सरप, सहा.कर अधिक्षक देवेंद्र भोजने, प्रकाश थुकेकर, प्रफुल हंबीर, श्रीकृष्णराव वाकोडे, सुरक्षा रक्षक संगीता शिंदे आदींची उपस्थिती होती.
याचसोबत उत्तर झोन अंतर्गत सिटी कोतवाली समोरील येथील वार्ड क्रं. सी-1 मालमत्ता क्रं. 742 धा.सुरेश व संतोष अग्रवाल, शे.सादिक शे.हसन यांचेकडे 2017-18 पासून आज पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 2,89,074/- एवढा मालमत्ता कर थकित असल्याने, तसेच जुना कपडा बाजार येथील वार्ड क्रं. सी-1 मालमत्ता क्रं. 579 खंडेलवाल धा. दिनेश अग्रवाल, दिपक अग्रवाल यांचेकडे 2017-18 पासून आज पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 4,86,148/- एवढा मालमत्ता कर थकित असल्याने, तसेच गांधी रोड येथील वार्ड क्रं. सी-1 मालमत्ता क्रं. 735 भाईचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटी, पवनकुमार गोयनका यांचेकडे 2017-18 पासून आज पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 2,73,412/- एवढा मालमत्ता कर थकित असल्याने सदर तीन्ही मालमत्तांवर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई सहा.आयुक्त विठ्ठल देवकते यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत झाली असून कारवाईत सहा.कर अधीक्षक हेमंत शेळवणे, मोहन घाटोळ, संतोष गाढेकर, सुनील नकवाल, मेश्राम, सुरक्षा रक्षक बाली इंगळे यांनी केली .
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांनी 31 मार्च 2025 पर्यंत मनपा व्दारा सुरू असलेल्या शास्ती अभय योजनेचा लाभ घेऊन आपला थकित व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा एकरकमी करून सील व जप्ती सारख्या अप्रीयकारवाई टाळावे, असे आवाहन मनपा प्रशासनाव्दारे केले आहे.
पुर्व झोनचे सहाय्यक आयुक्त विजय पारतवार, सहायक अधिक्षक तथा जप्ती पथक प्रमुख राजेश सरप, सहायक कर अधीक्षक देवेंद्रकुमार भोजने, कर वसुली लिपिक प्रकाश थुकेकर, लिपिक प्रफुल हंबीर, शिपाई कृष्णराव वाकोडे व सुरक्षा रक्षक संगिता शिंदे यांचा पथकात समावेश होता.
कार्यवाही दरम्यान मालमत्ता धारक जगदिश मुरूमकार यांनी वाद निर्माण करून अधिका-यांशी अरेरावीची भाषा केली. तसेच वाद-विवाद करून सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. पथकाने ही बाब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. त्यामुळे मनपा उपायुक्त गीता ठाकरे तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख चंद्रशेखर इंगळे व त्यांची टिम घटनास्थळावर दाखल झाली. जगदीश मुरूमकार यांनी त्यांच्याशी देखील वाद केला. त्यामुळे अखेर विजय पारतवार यांनी जगदीश मुरूमकार यांचे विरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला थकित व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा वेळेच्या आत करून सील, जप्ती व लिलाव सारख्या अप्रिय कारवाई टाळून मनपा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाव्दारा केले आहे.
थकित करापोटी पुर्व, उत्तर आणि दक्षिण झोन येथील 5 मालमत्तांवर सीलची कारवाई
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा उपायुक्त गीता ठाकरे आणि कर अधिक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत शिवर येथील वार्ड क्रं. अे-10 मालमत्ता क्रं. 257 धा.प्रदीप/प्रशांत यांचेकडे 2022-23 पासून आज पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 2,93,382/- एवढा मालमत्ता कर थकित असल्याने त्यांच्या मालमत्तावर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई सहा.आयुक्त विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात झाली असून कारवाईत सहा.अधिक्षक तथा पथक प्रमुख राजेश सरप, सहा.कर अधिक्षक देवेंद्र भोजने, प्रकाश थुकेकर, प्रफुल हंबीर, श्रीकृष्णराव वाकोडे, सुरक्षा रक्षक संगीता शिंदे आदींची उपस्थिती होती.
याचसोबत उत्तर झोन अंतर्गत सिटी कोतवाली समोरील येथील वार्ड क्रं. सी-1 मालमत्ता क्रं. 742 धा.सुरेश व संतोष अग्रवाल, शे.सादिक शे.हसन यांचेकडे 2017-18 पासून आज पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 2,89,074/- एवढा मालमत्ता कर थकित असल्याने, तसेच जुना कपडा बाजार येथील वार्ड क्रं. सी-1 मालमत्ता क्रं. 579 खंडेलवाल धा. दिनेश अग्रवाल, दिपक अग्रवाल यांचेकडे 2017-18 पासून आज पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 4,86,148/- एवढा मालमत्ता कर थकित असल्याने, तसेच गांधी रोड येथील वार्ड क्रं. सी-1 मालमत्ता क्रं. 735 भाईचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटी, पवनकुमार गोयनका यांचेकडे 2017-18 पासून आज पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 2,73,412/- एवढा मालमत्ता कर थकित असल्याने सदर तीन्ही मालमत्तांवर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई सहा.आयुक्त विठ्ठल देवकते यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत झाली असून कारवाईत सहा.कर अधीक्षक हेमंत शेळवणे, मोहन घाटोळ, संतोष गाढेकर, सुनील नकवाल, मेश्राम, सुरक्षा रक्षक बाली इंगळे यांनी केली .
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांनी 31 मार्च 2025 पर्यंत मनपा व्दारा सुरू असलेल्या शास्ती अभय योजनेचा लाभ घेऊन आपला थकित व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा एकरकमी करून सील व जप्ती सारख्या अप्रीय कारवाई टाळावे, असे आवाहन मनपा प्रशासनाव्दारे केले आहे.
0 Comments