ठेकेदार यांचे सोबत लागे बांधे असण्याची शक्यता
या कामाची गावकऱ्यांनी तक्रार देऊन सुद्धा काहीच कारवाई नाही
Mehkar सध्या मेहकर लोणार तालुक्यात मेहकर मध्ये ९८ आणि लोणार मध्ये ८० अश्या ग्राम पंचायत येतात प्रतेक ग्राम पंचायत याला जवळपास तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालय मंजूर होऊन कामे सुरू आहेत अश्या तच सावत्र गावातील लोकांनी तक्रारी द्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग मेहकर यांना कळविले आहे की सावत्र व नायगाव येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यांच्या भिंतीला आणि वरील स्लाप ल आताच तडे गेले आहे संडास चे शोष खड्डे दोन फूट खोल घेऊन थातुर मातुर कामे करून फक्त बिल काढण्याचे कामे केले आहेत कामे जवळपास पूर्ण होत आले असून त्याला माहीती चे बोर्ड सुद्धा लावलेले नाही.
नायगाव येथील मंडळ अधिकारी कार्यालय ची कार्यालयाची एक समोरील भिंत आताच कोसळली आहे त्यामुळे अश्या कार्यालयात जाण्यास नागरिकांच्या जीवास उद्या धोका निर्माण होऊ शकतो
पूर्ण झालेल्या कामाचा ठेकेदार कोन अंजाजपत्रक किती हे समजून येत नाही.
याची सविस्तर तक्रार सार्वजनिक बांधकाम उपविभाग मेहकर यांचे कडे तक्रारी द्वारे गावातील लोकांनी दिली आहे.
या बद्दल मंडळ अधिकारी बोरकर साहेब व तलाठी जोशी मॅडम यांना विचारणा केली असता कार्यालयात सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध असल्यास शिवाय आम्ही ते ह्यांड ओव्हर करून घेणार नाही अशी प्रतिक्रया त्यांनी दिली.
सरपंच सावत्र किशोर इंगळे यांना विचारले असता आम्ही आधी या कार्यालयाचे काम निकृष्ट होत असल्याचे पत्र च संबधित कार्यालय यास दिले आहे
अश्यातच जवळपास लोणार तालुक्यात आणि मेहकर तालुक्यात येणाऱ्या सर्वच १७८ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तलाठी कार्यालय आणि मंडळ अधिकारी कार्यालय यांचे कामे असेच निकृष्ट दर्जाचे होत असतील तर याची चोकशी करून सदर ठेकेदारावर कारवाई करून आमचे समाधान करावे आणि दोषी आढल्यास त्यांचे कढील ठेके काढून दुसरे ठेकेदारास देण्यात यावे आणि कामे चांगले करून घ्यावेत जेणे करून भविष्यातील धोका कमी होईल.अशी तक्रार ,अरविंद काठोले, सुभाष कथोले,दत्ता पगारे गजु निकस व इतर गावकऱ्यांनी केली आहे.
0 Comments