५ विद्यार्थीनी मिळवले ९९ पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण तर ९७ पर्सेंटाईल च्यावर २९ विद्यार्थी
दि.15फेबु / विदर्भदूत वृत्त/ shankar jogi
अकोला:प्रा. मोटेगावकर सरांच्या आर सी सी पॅटर्नने NEET मधील ऐतिहासिक निकालाबरोबरच आपण इंजिनिअरिंग साठी असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील जेईई मेन्स मध्ये पण नंबर १ असल्याचे सिद्ध केले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA ) च्या वतीने इंजीनियरिंग प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील जेईई-मेन परीक्षेमध्ये सुद्धा मोटेगावकर सरांच्या आरसीसी च्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे यामध्ये कार्तिक अशोक गुप्ता (९९.६३) योगेश उमेश शिरसागर (९९.५२) सृष्टी भगवान खरात (९९.०३)सौरव मधुकर शिंदे (९९.६०) आणि प्रसाद प्रमोद वाघ (९९.४०) यांनी सर्वाधिक १०० पैकी ९९ पर्सेंटाइल पेक्षा अधिक गुण घेतले आहेत तर १६ विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ९८ पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत .एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल २९ विद्यार्थ्यांना ९७ पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत तर शेकडो विद्यार्थ्यांना ९० पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत .फिजिक्स विषयात १३ विद्यार्थ्याना,केमिस्ट्री विषयात १७ विद्यार्थ्याना व अतिशय अवघड अशा मॅथेमॅटिक्स विषयात ३ विद्यार्थ्याना ९९ पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.या घवघवीत यशाबद्दल आर सी सी पॅटर्न चे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच विद्यार्थ्यांना पुढील ॲटेंम्प्ट देऊन एकप्रकारे ॲडव्हान्स परीक्षेची तयारी करावी अशा विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत .या यशस्वी विद्यार्थ्यांची भारतातील नामांकित समजले जाणाऱ्या
आयआयटी, एनआयटी ,बिट्स इत्यादी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.जेईई-मेन ही परीक्षा २ टप्प्यात घेण्यात येते .विद्यार्थ्यांच्या २ मधील कोणत्याही एका परीक्षेच्या सर्वाधिक गुणांचा विचार करून जेईई-ॲडव्हान्स साठी पात्र ठरविले जाणार आहे.
मागील ३ ते ४ वर्षात असंख्य विद्यार्थानी एम्स, जीपमर, मध्ये तर जेईई -ॲडव्हान्स परीक्षेद्वारे आयआयटी ,एनआयटी ,बिट्स इत्यादी कॉलेजेस मध्ये प्रवेश मिळवला आहे याचे मनस्वी समाधान प्राध्यापक मोटेगावकर सर यांनी व्यक्त केले .विद्यार्थ्यांनी अधिक अधिक परिश्रम घेऊन राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हावे व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे असे ते पुढे म्हणाले.
पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षेचा सराव व अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कोटा-हैदराबाद किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही हे आता मागील ५ वर्षात आमच्या आरसीसी पॅटर्न च्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे ,असेही ते म्हणाले .
राष्ट्रीय पातळीवरील कितीही अवघड व कठीण परीक्षेची तयारी करण्यासाठी मी स्वतः आणि माझी आर सी सीची टीम सक्षम आहे आम्ही बदलणाऱ्या शैक्षणिक धोरणाला व परीक्षा पद्धतीला आत्मसात केले आहे व भविष्यातही आम्ही कमी पडणार नाही असे प्रा .शिवराज मोटेगावकर आत्म विश्वासाने म्हणाले.
0 Comments