Ticker

6/recent/ticker-posts

कृषि विद्यापीठात फळे, भाजीपाला व फुल वर्गीय पिकांची शिवार फेरी!



शाश्वत शेतीसाठी विदर्भातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार दोन दिवसीय शिवार फेरी

उद्यानविद्या महाविद्यालय,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा महत्वाकांक्षी उपक्रम!

 Akola= मुख्यत: जिरायती शेती पद्धतीचा वापर असलेल्या विदर्भात शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यांचा लाभ घेत अनेकानेक शेतकरी कुटुंब आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया सक्षम होत आहेत. शेतातून प्रयोगशाळेकडे या तत्वाने अग्रेसीत या विद्यापीठाने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अनुभवी मार्गदर्शनात कृषि विस्तार कार्यावर भर दिला असून आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे विविध प्रयोग व प्रात्यक्षिके याची देही याची डोळा बघण्यासाठी उपलब्ध करीत आहे. केवळ अवलोकन नव्हे तर लागवडी पासून प्रक्रिया सहित बाजारपेठेतील विपणनाचे बरकावे आदींची तांत्रिक दृष्ट्या सांगड घालण्याचे कसब देखील या निमित्ताने शेतकरी बंधू भगिनींना आत्मसात करायला मिळत आहे.

याच शृंखलेत विदर्भातील वातावरणात उत्पादित होणारे व बाजारपेठेत चांगली मागणी असणारे फळे, भाजीपाला व फुल पिकांचे जिवंत प्रात्यक्षिके याची देही याची डोळा पाहण्याची व शास्त्रज्ञांकडून लागवड तंत्रज्ञान जाणून घेण्याची सुवर्णसंधी शेतकरी बंधू भगिनींना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्माचे सहयोगाने दिनांक 14 व 15 फेब्रुवारी 2025 रोजी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये 21 विविध भाजीपाला पिकांचे 34 वाण 20 एकर क्षेत्रावर तसेच 17 विविध फळ पिकांचे 34 वाण 200 एकर क्षेत्रावर आणि 23 विविध फुल पिकांचे 315 शोभिवंत प्रकार 10 एकर क्षेत्रावर असे एकूण 230 एकर क्षेत्रावर उद्यानविद्या विषयक 58 पिकांचे 383 पीक प्रात्यक्षिके सर्व तंत्रज्ञानासह प्रत्यक्ष पाहणीस उपलब्ध करून दिली आहेत.

सदर दोन दिवसीय उद्यानविद्या विषयक शिवार फेरी व चर्चासत्र कार्यक्रमाचे उदघाटन  शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता संपन्न होणार आहे.

 या अद्वितीय संधीचा आपण स्वतः लाभ घ्यावा तसेच इतरही शेतकरी, कृषिशी निगडित विस्तारकर्ते, अधिकारी -कर्मचारी युवक -युवती, विद्यार्थी वर्गानी घ्यावा असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे तथा उद्यान विद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments