बुलडाणा:- सत्ययुगात देवता व दानव तप करीत होते पण त्यांच्यात अंतर होते ,वेगवेगळे होते, त्रेता युगात देवता व दानव (राम रावण )वेगवेगळ्या ठिकाणी राहत, द्वापार युगात कौरव पांडव एकाच परिवारात होते, आणि कलयुगात दैवत व राक्षस यांची प्रवृत्ती एकाच मनुष्यात एकाच ठिकाणी वास करत आहे, मनुष्यात असलेल्या राक्षसी वृत्तीचा नाश करण्याचा करायचा असेल तर तीन दिवसाची नाही तर सात दिवसाची बुध्द चरित्र कथा आवश्यक आहे. आणि आपण ती आयोजित करुन असे प्रतिपादन व आश्वासन बुलडाणा अर्बन संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ सुकेशजी झंवर यांनी दिले. यावेळी सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सद्भावना सेवा समिती व सिंहनाद सेवा संघाच्या वतीने आयोजित बुद्ध चरित्र कथेच्या समारोप प्रसंगी डॉ. सुकेश झंवर बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. जिल्हाधिकारी श्री किरण पाटील व सौ पाटील यांनी प्रियदर्शी थेरोजी यांना व ग्रंथावर पुष्पमाला अर्पण करून वंदन केले. त्रिपीटिक या मूळ ग्रंथाच्या आधारे थेरोजी यांनी तीन दिवस कथेचे विश्लेषण केले. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र दिला. सारनाथला झालेल्या प्रथम उपदेश स्पष्ट केला. चार आर्य सत्य, अष्टांग मार्ग सांगितले. भगवान बुद्धाचे पूजन कोण करू शकतो तर जो परस्त्री मातेसमान मानतो ,लोभी, कामी नाही ,तर वासना शून्य आहे, सत्यवादी आहे, व्यसनी नाही, अभिमानी नाही, अशीच व्यक्ती बुध्दाला शरण जाऊ शकते, सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेशाम चांडक आणि सिंहनाद सेवा संघाचे अध्यक्ष विजय वाकोडे यांनी अथक परिश्रम घेतले .सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या म्हणून ही कथा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली असे गौरवोद्गार भंते प्रियदर्शी थेरोजी यांनी काढले. याप्रसंगी विशेष योगदान दिल्याबद्दल प्रियदर्शी थेरो यांनी भाईजी, डॉ. सुकेश झंवर सौ.कोमल झंवर यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला, व आशिर्वाद दिला. सोबतच सर्वश्री प्रा प्रकाशचंद्र पाठक ,सुरेश गट्टाणी, विजय सावजी, चंपालाल शर्मा, तिलोकचंद चांडक, सिद्धार्थ शर्मा, विजय वाकोडे ,संदीप मोरे, सुहास गवई गोलू जाधव कौस्तुभ वाकोडे , गजानन घिरके , शिवाजी गवई ,ज्योती आराख लता हिवाळे, चव्हाण ताई, अनिता वाकोडे, मून सर ,लॉर्ड बुद्धा चॅनलचे सतीश रुद्रकार, आशिष, प्रवीण भाऊ जाधव, फुलवाले, डॉ. सतीश वाकोडे एम्स भोपाळ, गवारे या सर्वांचा शाल व गुलाल पुष्प देऊन सन्मान केला व आशीर्वाद दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भंते मेत्तानंदजी यांनी केले , यावेळी हजारो उपसकांनी बुद्धचरित्र कथा पुन्हा घेण्याची विनंती केली.
0 Comments