Ticker

6/recent/ticker-posts

जानेफळात महापुरूषांच्या संयुक्त जयंती निमित्ताने शाहिरांचा जंगी मुकाबला संपन्न

 


प्रबोधनकारी गीतांनी प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे दि.१७ फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज संत रोहिदास महाराज, संत सेवालाल महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई, माता भिमाई यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने जानेफळ येथे दैनिक सा. जानेफळ एक्सप्रेसचे मुख्य संपादक अशोक शेजुळ यांच्या नियोजनात महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका अश्विनी खोब्रागडे, चंद्रपूर व शाहिर संघपाल गवई यांचा व इतर शाहिरांचा गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. संजयजी रायमूलकर तर प्रमुख उपस्थितांमध्ये ठाणेदार अजिनाथ मोरे,मा.सरपंच गजाननतात्या कृपाळ, अंबिका अर्बनचे संस्थापक अध्यक्ष मोहन जीवन धोटे पाटील,मा. पं. स. गजानन वडणकर, भाजप ता. अ. ऍड. शिव ठाकरे, सा. का. रामेश्वर मुरडकर,मा. हिम्मत आवले, अशोक बोरकर, पत्रकार अमर राऊत, संपादक गजानन दुतोंडे, जा. प्रे. क्लब अध्यक्ष मनिष मांडगवडे, ग्रा. सदस्य संजय सुरजुशे, मंटू राजूरकर,पत्रकार संघ ता. अध्यक्ष दत्ता उमाळे,मुख्याध्यापिका सौ. मीनल जोहरे,ऍड. बबन वानखेडे, ऍड. राजेश दाभाडे,मा. सरपंच किशोर गव्हाड,श्रीधर सपकाळ,भगत सर,पंजाबराव गवई,सुरेश सरदार, योगेश सपकाळ सर उमेश सदावर्ते, मिसाळ  उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जानेफळ एक्सप्रेसचे निवासी संपादक डॉ. कृष्णा हावरे यांनी केले. संयुक्त उत्सव समितीचा उद्देश व सर्व महापुरुषांच्या जीवनाचे विचार त्यांनी उपस्थित बंधू भगिनी यांचा समोर मांडून सर्वांना भावनिक केले.

 त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा व गायकांचा आयोजन समितीचे संपादक अशोक शेजूळ,पत्रकार अंकुश वानखेडे, मु. अ. देवेंद्र पद्मने, प्रदीप सरदार, सरपंच किशोर इंगळे, शिक्षक संतोष गवई,सा. का. रामेश्वर मुरडकर, राजेश सपकाळ यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 त्यानंतर झालेल्या गीत गायनामध्ये मा.अश्विनी खोब्रागडे,चंद्रपूर संघपाल गवई व उपस्थित गायकांनी बहुजन महापुरुषावरील गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर, संजय सुरजुशे, रामेश्वर मुरडकर यांनी आर्थिक स्वरूपात कौतुक केले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हावरे यांनी तर आभार प्रदर्शन जानेफळ एक्सप्रेसचे मुख्य संपादक अशोक शेजुळ यांनी केले.











Post a Comment

0 Comments