बुलढाणा :मनुष्य जन्माने शुद्र किंवा ब्राम्हण नसतो. तर कर्माने मनुष्य शुद्र व ब्राम्हण होतो. कठोर तप आणि साधनेमुळे उच्चतम अवस्था प्राप्त होते. बुद्ध चरित्र भगवंत कथेचे अमृतवर्षा सामान्य मनुष्याला बुद्धत्वाकडे नेते. असे प्रतिपादन पुज्य सदधर्माचार्य भिक्षु प्रियदर्शी थेरोजी यांनी बुद्धचरित्र कथेचे प्रथम पुष्प गुंफताना केले.
सद्भावना सेवा समिती आणि सिंहनाथ सेवा संघ द्वारा सहकार विद्या मंदिर दि.31 जानेवारी ते 02 फेब्रवारी पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रियदर्शी थेरोजी, भंन्ते मेत्तानंदजी, राधेशामजी चांडक, डॉ.सुकेश झंवर, सौ. कोमल सुकेश झंवर, विजय वाकोडे, शिवाजीराव गवई यांनी सहकार विद्या मंदीर परिसरात असलेल्या गौतम बुद्धांच्या मुर्तीचे पुष्प देऊन वंदन केले.
यश सिद्धी सैनिक संघाने शिस्तबद्ध रितीने संचलन करीत भिकुसंघाच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन करण्यात आले. व मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहनानंतर कथाचार्य प्रियदर्शी थेरोजी यांना पीठा कडे उपासक व उपासिका द्वारे सन्मानाने नेण्यात आले. या प्रसंगी राधेशामजी चांडक, डॉ.सुकेश झंवर,सौ कोमलताई झंवर,राजेश देशलहरा, चंपालाल शर्मा, तिलोकचंद चांडक, सिद्धार्थ शर्मा, विजय वाकोडे, शिवाजीराव गवई, विजय सावजी, प्रकाशचंद्र पाठक, उमेश मुंदडा, प्रशांत इंगळे, गजानन जाधव, शैलेश भंडारे, सोनाजी दाभाडे, अनंताभाऊ देशपांडे, सुहास गवई, पगारे, सरकटे,डोंगरदिवे आदी सर्व मान्यवर उपस्थित होते.
पीठावर भगवान बुद्धाच्या मुर्तीचे सर्वांनी पुष्प दान करुन दर्शन घेतले, उपासक व उपसिकांनी सामुहिक याचना केली. राधेशाम चांडक यांनी प्रियदर्शी थेरोजींना ग्रंथावर माल्यार्पण अर्पण करुन वंदन केले. भंते मेत्तानंद यांनी थेरोजीचा परिचय करुन दिला. थेरुजी यांची विद्वता व मधुर वाणीमुळे सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अनेक कथा सुरस व रसाळ वर्णन करुन सांगीतल्या.
सहकार विद्या मंदिर परिसरात असलेले भगवान बुद्धाची मुर्ती अठ्ठावीसावे बुद्ध असल्याचे सांगीतले. कथेचे पुष्प गुंफताना बुद्धाच्या जन्माची कथा, कठोर तप, बोधीकथा ऐकुण श्रोत्यांचे डोळे पानावले होते. बुद्धाइतके कठोर तप कोणीही केले नाही. तप करतांना बुद्धांचे शरीर पाण्यावर वाहुन जाणा-या झाडाच्या पानासारखे झाले होते. पुढे भंते म्हणाले की, बुद्धाचा जन्म व्हायचा असेल तर, आई-वडीलांनी कोणत्या गोष्टी पाळायच्या हे सविस्तर स्पष्ट केले. सत्य हे खोट्या व्यक्तीलाच कडु असते. सत्यवादी व्यक्तीला सत्य हे सुमधुर असते.
अनेक सुत्राच्या आधारे थेरोजी यांनी बुद्धचरित्र अमृत वर्षा केली. सभागृहातील श्रोते आनंदाच्या लाटेवर पोहत होते, असे जाणवत होते. भंते मेत्तानंदजी यांनी सुत्रसंचालन केले. या कथेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक आणि सिंहनाद सेवा संघाचे अध्यक्ष विजय वाकोडे यांनी केले. सहकार विद्या मंदिराच्या दोन बसेस व उपासकांचे ऑटो विनामुल्य श्रोतांना ने-आण करीत होते. उस्फुर्त सेवा ऑटोने दिले हे सुद्धा एक प्रकारचे धम्मदान असल्याचे भंतेजीनी सांगीतले
0 Comments