Ticker

6/recent/ticker-posts

जिजामाता महिला बँक उत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित

 


बुलडाणा  - विदर्भ स्तरावर कार्यरत सर्व को- ऑप बँकेची सलग्न असलेल्या संस्थांना दरवर्षी उत्कृष्टपणे कामकाज करणाऱ्या तसेच सामाजिक दायित्व भावना कायम ठेवून समाजाचे व राष्ट्राचे आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्याकरिता मोलाचे कार्य करणाऱ्या, त्याचप्रमाणे रिझर्व बँकेचे आदर्श प्रमाणके व निकष पूर्ण करून त्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच बँकेचे कामकाज करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ट जलद व तत्पर ग्राहक सेवा देणाऱ्या तसेच बँकिंग क्षेत्रात नवनवीन कल्पना आत्मसात करून सतत प्रगती करणाऱ्या बँकांना उत्कृष्ट बँकेचा पुरस्कार देण्यात येतो आर्थिक वर्ष 2023- 24 करिता बुलडाणा येथील जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेला विदर्भ अर्बन को-ऑप बँक फेडरेशन नागपूर, तर्फे पुरस्कार प्राप्त झाला आहे सदर पुरस्कार बँकेला मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी शेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री माननीय डॉ .पंकज भोयर यांच्या शुभहस्ते  प्रदान करण्यात आला. असून बॅंकेचे अध्यक्षा सौ रेखाताई झंवर, उपाध्यक्ष श्रीमती शिलाताई सांबारे, सरव्यवस्थापक दिपक अग्रवाल, यांनी स्वीकारला. सदर पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी बँकेचे अध्यक्ष सौ रेखाताई झंवर उपाध्यक्ष श्रीमती शिलाताई सांबारे व सरव्यवस्थापक दिपक अग्रवाल यांना  बँक द्वारा प्रकाशित अर्थ सरिता ही पुस्तक भेट म्हणून यावेळी देण्यात आली. 

      याप्रसंगी माहिती देताना जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सौ रेखाताई झंवर म्हणाल्या की बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट ग्राहक सेवा दिले. बँक आपल्या ग्राहकांना नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा तत्पर व विनम्र सेवा प्रदान करीत आहे. असोशियन तर्फे प्राप्त पुरस्कार हा बँकेचा कामकाजाचा गौरवाचा व प्रतिष्ठेचा आहे तसेच या पुरस्कारामुळे सहकार क्षेत्रात फक्त जिजामाता महिला बँकेचा नावलौकिक झालेला नसून बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर झालेला आहे, भविष्यात देखील बँकेचा उज्वल प्रगती करता, बँकेच्या सर्व सभासद ठेवीदार, खातेदार व हितचिंतक याचे अनमोल सहकार्य निरंतर मिळत राहील व बँकेचे उत्तरोत्तर प्रगती होत राहील, असा ठाम विश्वास बँकेचे अध्यक्ष सौ रेखाताई झंवर यांनी व्यक्त केला. यावेळी बोलतांना जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक दिपक अग्रवाल यांनी भाईजींच्या मार्गदर्शनामध्ये व सभासद तसेच ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. विदर्भ स्तरावर जिजामाता बँकेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल विविध स्तरावरील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments