Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

 


कानशिवणी :-- कानशिवणी येवता रोडवर श्रीमती मेहरबानु कॉलेज अकोला च्या २३ वर्षीय विद्यार्थ्यांचा अपघात होऊन जाग्यावरच मृत्यू झाल्याची घटना सोमवार रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली..

 कानशिवनी येथील सुमित कैलास ढोरे हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एम एच ३० व्ही ६६४० या मोटरसायकलने घरून कॉलेज करीता दहाच्या दरम्यान निघाला. बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येळवण शिवारातील दत्तवाडी जवळ रोडवरील काम सुरू असलेल्या ग्रेडर या मशीनच्या चालकाने आपली मशीन रिव्हर्स (मागे ) घेत असताना कॉलेज करिता जात असलेल्या सुमित ढोरे यांना धडक देऊन त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रेडर मशीनच्या चालकाचे लक्षात आल्यानंतर चालकाने तेथून पळ काढला. अपघात झालेल्या घटनेची बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस व बार्शीटाकळी पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. 

 कानशिवनी येवता रोडचे काम सुरू आहे रोडवर टाकलेल्या मुरूम लेवल करण्याकरिता ग्रेडर या मशीनचा उपयोग घेत आहेत. वाहतूकीच्या रस्त्यावर सदर रोडचे काम सुरू असून चालकाने निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांला आपला जीव गमवावा लागला. व मशीन चालकासोबत मशीन मागेपुढे घेण्याकरिता एक कामगार असता तर हा अपघात टळला असता असेही  उपस्थित नागरिकांमध्ये बोलल्या जात होते.

ग्रेडर मशीन वर नंबर प्लेट नसल्यामुळे मशीन चालक-मालक व प्रशासनाबद्दल उलट सुलट चर्चा होते होती 

कैलास ढोरे यांना दोन मुलं होते त्यामधील सुमित हा लहान असुन तो श्रीमती मेहरबानू कॉलेज अकोला येथे बीसीए प्रथम वर्षांमध्ये शिक्षण घेत होता.

Post a Comment

0 Comments