अकोल्यात विधवा महिला परिषदेच्या आयोजनार्थ सामाजिक घटकांचा पुढाकार !
अकोला = एकल महिला सोबत पुनर्विवाह करून त्यांच्या पेक्षा त्यांच्या मुलावर अधिक प्रेम करा... ही विधवा महिलांच्या उत्थानाची चळवळ बुलढाण्यातून सुरू झाली, तिला अकोला जिल्ह्यातही आता बळ मिळत आहे. अकोल्यात होऊ घातलेल्या विधवा परिषदेच्या आयोजनार्थ बैठक येथील पत्रकार तुषार हांडे यांच्या सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात पार पडली. विशेष बाब म्हणजे विविध समाज घटकांनी याचे स्वागत करून सहभागी होण्याचे निश्चित केले आहे.तर अकोला, अमरावती नंतर राज्यभर ही चळवळ राबविणार असल्याचे मानस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने यावेळी बोलताना म्हणाले.
विधवा महिलांच्या जीवनात उजेड पेरण्यासाठी सुरू असलेल्या चळवळीस गतिमान करण्यासाठी दत्तात्रय लहाने बुलढाणा यांचे मार्गदर्शनात अकोला येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आजही सुरू असलेली विधवा प्रथा बंद करून त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे तसेच विधवा, घटस्फोटीत,परीतक्ता महिलांचे पुनर्विवाह व्हावेत यासाठी बुलढाण्यात मानस फाउंडेशन ने पुढाकार घेतला आहे. विधवा परिषदा ,विधवा विवाह सोहळे व विधवांच्या आर्थिक उन्नतीची चळवळ बुलढाण्यात राबवण्यात आली. अकोला जिल्ह्यात या सामाजिक चळवळीला बळ मिळावे यासाठी जागतिक महिला दिना निमित्ताने विधवा परितक्ता परिषद आयोजित करण्याचे ठरवले आहे. त्यानिमित्ताने आज दिनांक 12 फेब्रुवारीला छोटेखानी बैठकीचे आयोजन सेवाधर्म शिक्षण व बहुउद्देशीय संस्था अकोला चे कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. सदर बैठकीला दत्तात्रय लहाने, प्रा. शिवराम बावस्कर , अँड जितेंद्र बगाटे, डॉ. अनिल मूलचंदानी, नरेश ओंकार मानकर, डॉ. नेहा मानकर, गणेश निकम , ॲड. आरती टाकळकर तथा तुषार हांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती आवश्यक होती. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीही या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करून या चळवळीस बळ देण्याचे सुत्वाच केले आहे.
0 Comments