पातुर – तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळडोळी (पेडका) येथे सोमवारी (दि. १८ फेब्रुवारी) मंगळवार रोजी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. अज्ञात व्यक्तीने देवकाबाई भगवान अलाट (५५) यांच्या गोठ्याला आग लावल्याने ४० शेळ्या होरपळून मृत्यू पावल्या आहेत. या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला असून, 3 लाखांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देवकाबाई अलाट (वय ५५) या महिलेने आपल्या कष्टाच्या जोरावर एका शेळीपासून ४० शेळ्यांचा गोठा उभा केला होता. त्यांचा हा शेळीपालन व्यवसाय म्हणजे त्यांच्या जीवनाचा मुख्य आधार होता. प्रत्येक शेळीच्या किमतीवर तिच्या कष्टांची, सुसंस्काराची आणि खूप संघर्षांची छाया होती. सर्वसाधारणपणे गावातील शेतकरी महिलांप्रमाणे देवकाबाई यांनी मोलमजुरी करून कधी कधी तुटपुंज्या पगारावर दिवस घालवले, पण शेळीपालनामुळे त्यांना काहीतरी स्वाभिमानपूर्ण जीवन जगता आले.
या महिलेच्या मेहनतीला वाऱ्यावर उडवून देणारी ही आग तिच्या कष्टांचा पराभव आहे. आगीच्या या भयानक घटनेत संपूर्ण गोठा जळून खाक झाला, त्यामध्ये असलेल्या ४० शेळ्या मृत झाल्या. गोठ्यातील प्रत्येक शेळी तिच्या कष्टाची कमाई होती, जी महिलेने एक शेळीपासून ४० शेळ्या उभ्या केल्या होती. त्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे फक्त शेळ्यांचं जीवनच नाही, तर त्या कष्टाचं मूल्यही जळून खाक झालं.
आगीची माहिती मिळताच, गावकऱ्यांनी, विशेषतः युवकांनी, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सर्वांनी एकत्र येऊन आग विझवण्यासाठी आपले प्राण पणाला लावले, पण आगीचे स्वरूप इतके भयंकर होते की, गोठा आणि शेळ्या बचावता येऊ शकल्या नाहीत. गोठ्याचे आणि शेळ्यांचे नुकसान पाहून देवकाबाई यांचे हृदय विदीर्ण होऊन गेले.
घटनेची माहिती मिळताच, ग्रामपंचायत सरपंच पती दिलीप ताजने यांनी तहसीलदार आणि चान्नी पोलिसांना कळवले. चान्नी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर गीते आणि राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे.
या संपूर्ण घटनेत फक्त एक कुटुंबच नाही, तर संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं आहे. देवकाबाई यांना शेळीपालनामुळे फडशेगावर ओळख मिळाली होती, पण आता या भयंकर आगीत त्यांना पुन्हा एकदा मोलमजुरीची कष्टांची धारा पेलावी लागणार आहे. गावातील लोक आणि प्रशासन एकत्र येऊन त्यांना मदत करण्याचा आश्वासन देत आहेत.
मी आणि माझी आई वडिलांपासून विभक्त राहतो आईने एका शेळी पासून चाळीस शेळ्या केल्या या शाळेच्या भरोशावर माझी संपूर्ण शिक्षण झाले शेळ्याचा मोठ्या प्रमाणात आम्हाला आधार होता त्या शेळ्यावर आमचे कुटुंब आणि उदरनिर्वाह चालत असे या घटनेने आम्ही पूर्ण माहिती झाले असून दोषीवर कारवाई व्हावी तसेच आम्हाला शासकीय मदत मिळावी अशी आमची मागणी आहे
गोपाल अलाट
0 Comments