Ticker

6/recent/ticker-posts

टाकरखेडा संभू ते आष्टी मार्गाच्या दुरुस्तीकरीता उपसरपंचाचा एल्गार


26 जानेवारी पासून आंदोलनाचा इशारा
पालकमंत्री लक्ष देतील का,आरडीसींच्या बांधकाम विभागाला सूचना

टाकरखेडा संभू(वार्ताहर) संतोष शेंडे
आष्टी ते टाकरखेडा संभू या पाच किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली असून येथे किरकोळ अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.त्यामुळे रस्त्याचे त्वरित बांधकाम करण्यात यावे या  मागणी करिता अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप शेंडे यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे, परंतु शासनाकडून अद्यापही याची दखल न घेतल्याने अखेर त्यांनी 26 जानेवारी पासून रस्त्याच्या बांधकामा करता  आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, तिची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन दिवसात मार्क काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत,

आष्टी ते टाकरखेडा संभू या मार्गे साऊर, तळवेल, चांदूरबाजार, रामा, पूर्णानगर या मार्गावरील वाहतूक  मोठ्या प्रमाणात  वाढलेली आहे. त्यामुळे हा वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्याची सध्या दुरावस्था झालेली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत.दरवर्षी लाखो रुपये खर्च करून या रस्त्याची तात्पुरती डागडूजी केली जाते.परंतु पक्का रस्ता बांधल्या जात नाही. त्यामुळे याची दखल घेऊन आष्टी ते टाकरखेडा संभु या पाच किलोमीटर रस्त्याची दुरुस्तीकरणे ऐवजी पक्का रस्ता बांधावा अशी मागणी उपसरपंच प्रदीप शेंडे यांनी केलेली आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ वर्षांपूर्वी या रस्त्याचे पक्के बांधकाम केले होते. त्यानंतर या रस्त्याची केवळ आता तात्पुरती दरवर्षी डागडुजी केल्या जाते. त्यानंतर पुन्हा दरवर्षी रस्त्याची स्थिती जैसे थे होते ,त्यामुळे या मार्गावर किरकोळ अपघाताच्या घटना   घडत आहेत. सदरचा रस्ता बांधकामा करता अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असतानाही प्रशासनाने नियोजनामध्ये या बांधकामाच्या रस्त्याला मंजुरात दिलेली नाही, त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम रखडलेले आहे, त्यामुळे या आर्थिक वर्षातच या रस्त्याच्या बांधकामाकरीता तरतूद उपलब्ध करावी या मागणीसाठी आता गावातील उपसरपंच प्रदीप शेंडे यांनी एल्गार पुकारला असून येत्या 26 जानेवारीपासून त्यांनी  आंदोलनाचा इशारा दिलेला आहे ,याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून रस्त्याच्या कामाबाबत सूचना दिलेल्या आहे ,त्यामुळे येत्या दोन दिवसात यावर मार्ग न निघाल्यास प्रदीप शेंडे 26 जानेवारी पासून आंदोलनाला बसणार आहे,


रस्त्याची खस्ता हलक तरीही मान्यता का नाही,
 सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्राधान्य क्रमाच्या रस्त्याची यादी असते, म्हणजे ज्या रस्त्याची अवस्था खराब झाली आहे तो रस्ता आधी बांधणे क्रमपात्र आहे, मात्र असे असताना गेल्या दोन-चार वर्षांपासून याचा पाठपुरावा सुरू असतानाही या रस्त्याला मान्यता का देण्यात येत नाही, हे मात्र गुलदस्त्यात आहे, त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन याच आर्थिक वर्षामध्ये या रस्त्यावर तरतूद करून बांधकाम मंजूर करावे अशी मागणी आता प्रदीप शेंडे यांनी रेटली आहे.

Post a Comment

0 Comments