Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा गांधीजींच्या स्मृती जतन करणार- आमदार साजिदखान पठाण


अकोला-- अकोला शहराचे वैभव वृद्धिंगत करण्यासाठी गांधी जवाहर बागेतील महात्मा गांधीजींच्या स्मृती संवर्धन करणार असल्याचे प्रतिपादन आमदार साजिद खान पठाण यांनी केले.. ते राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी /हुतात्मादिनानिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने आयोजित सूत कताई यज्ञ व व्यसनमुक्ती संकल्प कार्यक्रमात बोलत होते. सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, प्रा. राजाभाऊ देशमुख ,विजय कौसल, अँड. विलास वखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधी जवाहर बागेत सकाळी नऊ वाजेपासून सूत कताई यज्ञ करण्यात आला. सर्वोदयी कार्यकर्त्यांनी चरख्यावर सूत कताई करून गांधीजींच्या स्मृतीस कृतिशील आदरांजली वाहिली. सर्वश्री प्रल्हादराव नेमाडे,डाॅ.मिलिंद निवाणे,श्रीकृष्ण विखे पाटील,अनिल मावळे,वासुदेवराव काळमेघ, श्रीमती सुमित्रा निखाडे, रामचंद्र राऊत बाबुळगाव ,संजय इंगळे, श्रीकृष्ण माळी ,डॉ. गुरुचरण ठाकूर, पार्थ उत्तम गिरी खडकी, संजय मालोकार, रामराव पाटेखेडे,रोहित तारकस,हिम्मतराव गावंडे,आकाश इंगळे, साहेबराव तायडे ,शंकरराव सरप यांनी चरख्यावर सूत कताई करून आदरांजली वाहिली.

नशाबंदी मंडळाचे व्यसनमुक्ती प्रदर्शनी लावून प्रबोधन करण्यात आले. कवी रामराव पाटेखेडे यांनी व्यसनमुक्ती वर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन सादर केले. सर्वश्री कॉम्रेड रमेश गायकवाड डाॅ.धनंजय नालट,सुमेध खंडारे,अशोक रामटेके,विनोद ठोंबरे,केशवराव काठोळे,रामदास शेळके,ह.मो.खटोड गुरुजी,रहेमान बाबू,बुढण गढेकर, सचिन वनारे ,अंकित काकड, अजिंक्य राऊत ,अजय मते ,अब्दुल नईम यांचे सह शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीस भेट दिली. याप्रसंगी थोर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते एडवोकेट मा.म. गडकरी, मोहन हिराबाई हिरालाल,सरोजिनी विद्याधर नाघाटे खामगाव यांच्या दुःखद निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मिलिंद निवाने यांनी केले. आभार प्रदर्शन अनिल मावळे यांनी केले .सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments