दर्यापूर : रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची तीन महिन्यांपासून मस्टर प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांना मजुरी मिळत नसल्याने मजुरांची उपासमार होत असल्याने याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हा रोजगार समितीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी केली आहे. सोनटक्के यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनानुसार रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीचे मस्टर तीन महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या संदर्भात पाठपुरावा करून देखील कोणतीच कारवाई होत नसल्याने मजुरांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची समस्या आणखीन तीव्र होणार नाही, अशी मागणी सोनटक्के यांनी केली आहे.
0 Comments