Ticker

6/recent/ticker-posts

अमरावतीत बांगलादेशी रोहिग्याना आश्रय दिला जातो, भाजप खासदार अनिल बोंडे यांचा खळबळजनक आरोप



अमरावती : अमरावतीत बांगलादेशी रोहिंग यांना आश्रय दिला जातो, असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे अमरावतीत आश्रयित असलेल्या बांगलादेशीना शोधून काढण्याचे एक मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. अमरावती म्हणजे प्रयोगशाळा करून टाकली आहे. मागे ज्यावेळी दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी इथे बांगलादेशी यांना आश्रय दिला जात असल्याचा देखील स्पष्ट केलं होतं. पोलीस आयुक्तांना या संदर्भात पत्र देत कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती डॉ.बोंडे यांनी दिली आहे. अमरावतीत आश्रयित असलेले बांगलादेशी रोहिंग्या की पश्चिम बंगालचे रहिवासी याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्याच प्रकरण बाहेर काढलं. त्यावेळी सर्वजण जागरूक झाले आहेत. औद्योगिक वसाहतीत बांगला बोलणारे नागरिक आहेत. त्यामधील अनेक जणांची कागदपत्र ही संशयास्पद आहेत. ते बांगलादेशातून आले असल्याचे महाराष्ट्रात आता जाहीर झालं आहे. सैफ अली खान फतोडी याच्यावर हल्ला करणारा देखील बांगलादेशी आहे. त्यामुळे या बांगलादेशीवर कडक कारवाई करण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे असे देखील बोंडे यांनी स्पष्ट केले आहे.

वेळ आली आहे यांना बाहेर काढण्याची
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पोलिसांनी या प्रकरणात कठोर पाऊल उचलली आहेत त्यासाठी पोलीस खात्याचं मनःपूर्वक अभिनंदन करतो असं डॉ.अनिल बोंडे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे औद्योगिक वसाहतीत असलेल्या विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांनी आवाहन केले की, कामावर कामगार ठेवताना त्यांची पूर्ण खातर जमा करावी. भारतात राहून हे कुणाच्यातरी जीवावर उठतील. त्यामुळे त्यांना इथून बाहेर हाकलण्याची वेळ आली असल्याचा आक्रमक पवित्रा देखील त्यांनी घेतला आहे.

Post a Comment

0 Comments