दर्यापूर : तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम अवैध सुरू असल्याची तक्रार तसेच त्या संदर्भातील पुरावे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यापर्यंत पोहोचल्याने येवदा येथील अवैध धंद्यांचा चेंडू आता एसपींच्या कोर्टात पोहोचला आहे. एसपी यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलेले असतानाच दुसरीकडे तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने तक्रारदार पंकज कान्हेरकर यांनी प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारीला उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दर्यापूर तालुक्यातील येवला पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये राजरोसपणे वरली मटका गुटखा गोवंश तस्करी तसेच अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फुपावली आहेत याची पुराव्याशी तक्रार भाजपा युवा मोर्चा कार्यकारणी सदस्य पंकज कान्हेरकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल गुंडे यांच्याकडे केली होती. पुरावे देऊ नये या तक्रारीत वरिष्ठ पोलीस अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे त्यामुळे 26 जानेवारी रोजी येवदा पोलीस प्रशासनाच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर यांच्या जालनात आपण ठिय्या आंदोलन करणार असल्याचं पंकज कान्हेरकर यांनी कळविले आहे.
भाजपा ज्येष्ठ नेते बाळासाहेब वानखडे यांची एसपीकडे तक्रारपंकज कान्हेरकर यांनी दिलेल्या तक्रारीची भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना तातडीचे पत्र लिहीत ऐवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेला संपूर्ण प्रकार या पत्रात नमूद केला आहे. तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी देखील वानखडे यांनी केली आहे.
0 Comments