Ticker

6/recent/ticker-posts

वाईन बार असोसिएशन अध्यक्षांच्या बार सील; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई



शंकर जोगी / विदर्भेदूत वृत्त /अकोला : जिल्ह्यात अवैध दारू विक्री, बुटलिकिंग फोफावली , या विरोधात वाईन बार असोसिएशनने गेल्या सहा महिन्यांपूर्वी निवेदन देत राज्य उत्पादन शुल्क विभागाला  कारवाई करण्याची मागणी केली होती. 

मात्र उत्पादन शुल्क विभागाने या निवेदनकर्त्याना विविध प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करीत त्यांच्यावर कारवाया केल्या.  शनिवारी दुपारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बुटलिकींग, अवैध दारू विक्री विरोधात आवाज उचलणाऱ्या वाईन बार असोसिएशनच्या अध्यक्षांची बार सील केल्याने वातावरण चांगलेच चिघळले असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला असोसिशनचे अध्यक्ष अतुल पवनीकर जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषणाला बसले आहे. 
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बेताल कारभाराविरुद्ध गेल्या सहा ते सात महिन्यांपासून वाईन बार असोसिएशनच्या वतीने आवाज उठविणे सुरू आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री, महामार्गावरील धाबे, हॉटेलवर होणारी सर्रास दारू विक्री, बुटलिकिंग या सर्व गैर प्रकाराविरुद्ध वाईन बार असोसिएशनच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली होती. मागणी रास्त असताना सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी थेट निवेदन देण्याकरिता उपस्थित असलेल्या वाईन बार असोसिएशनच्या पदाधिकारी यांनाच नियमांचे धडे शिकवीत कारवाईत अडकविण्याच्या धमक्या दिल्या. परिणामी त्यावेळी वाईन बार असोसिएशनच्या उपस्थित  पदाधिकारी यांनी थेट ठिय्या आंदोलन केले होते, सदर ठिय्या आंदोलन मोडण्यासाठी त्यावेळी स्वतः जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी  करीत समजूत काढली होती; मात्र विविध प्रकार निकष समोर करीत बेकायदेशीर कारवायांचा सपाटा उत्पादन शुल्क विभागाने लावला होता. या कारवाईत तब्बल 20 ते 25 बार चालकांना गोवल्या गेल्याचे निवेदनात नमूद आहे. शनिवारी या कारवाईचा भाग म्हणून वाईन बार असोसिएशनच्या अध्यक्षांच्याच वाईन बारला सील ठोकण्यात आले. परिणामी वाईन बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पवनीकर हे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले आहे. यावेळी पदाधिकारी, बार संचालक सुद्धा उपस्थित होते. 


आमदार नितीन देशमुख उपोषण स्थळी
असोसिएशनच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाची माहिती मिळताच  उपोषण स्थळी आमदार नितीन देशमुख दाखल झाले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बेताल कारभारावर नाराजी व्यक्त करीत सदर प्रश्न जिल्हा नियोजन बैठक आणि आगामी अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले . वाईन बार असोसिएशनच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाची माहिती मिळताच ते उपोषण स्थळी दाखल झाले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बेताल कारभारावर नाराजी व्यक्त करीत सदर प्रश्न जिल्हा नियोजन बैठक आणि आगामी अधिवेशनात उचलणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

पूर्व सूचना न देता  बार सिल..!
-शनिवारी शेगाव नाका भौरद येथील यश वाईन बारला दुपारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सील ठोकण्यात आले. विशेष म्हणजे या कारवाई पूर्वी कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 


शासनाला कोट्यवधींचा चुना...! 
-जिल्ह्यात बुटलिकिंग मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री फोफावली आहे. यामुळे शासन महसुलाला मोठ्या प्रमाणात घट होत आहे. ही घट महिण्याकाठी कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त आहे. 
  1. आ. देशमुख यांची उपोषण मंडपाला भेट 
  2. वाईन बार असोसिएशनच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाची माहिती मिळताच ते उपोषण स्थळी दाखल झाले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बेताल कारभारावर नाराजी व्यक्त करीत सदर प्रश्न जिल्हा नियोजन बैठक आणि आगामी अधिवेशनात उचलणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

विदर्भ दूत बातम्या जाहिरातीसाठी .
कार्यकारी संपादक
शंकर जोगी
8805153264

Post a Comment

0 Comments