पुणे- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची महाविद्यालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी , अशा आशयाचे निवेदन आज उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांना टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट च्या वतीने डॉ.प्रशांत विघे यांनी दिले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शंभर टक्के पदे भरल्या गेल्या पाहिजेत,अशी तरतूद आहे.
परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्रातील महाविद्यालयात शिक्षक संवर्गाची ५४% पदे रिक्त आहेत. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून अनेक अडचणी संस्थाचालक व प्राचार्यांसमोर निर्माण होत आहेत. अध्यापन व कार्यालयीन कामकाज सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्ण पदे भरण्यात आल्यात , तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणण्यास सहकार्य लाभेल, आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या प्रगत होईल, अशी अपेक्षा टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट च्या वतीने डॉ.प्रशांत विघे यांनी दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती प्रमाणेच
१९ सप्टेंबर १९९१ ते १४ जून २००६ या काळात झालेल्या नियुक्तीच्या दरम्यान ११ जुलै २००९ पर्यंत ज्यांनी एम.फिल ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यात आलेली आहे. त्या आधारावर वेळोवेळी मागण्यात आलेले प्रस्ताव त्वरित संचालक, उच्च शिक्षण विभाग, पुणे कार्यालयाने युजीसी कार्यालयासोबत पाठपुरावा करून त्वरित निकाली काढावे,
समाजकार्य महाविद्यालयातील स्थान निश्चिती पूर्ण करून सह-संचालक कार्यालयातून आर्थिक स्वरूपाची कार्यवाही लवकरात लवकर मार्च २०२५ पासून सुरू करावी. सोबतच समाजकार्य महाविद्यालयामध्ये २००५ पूर्वी शासनाच्या निर्देशाप्रमाणे विनाअनुदानित तत्वावर लागलेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,
महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरती करत असताना २०१७ पर्यंत रिक्त झालेल्या जागावर पदनिश्चिती न करता डिसेंबर२०२४ पर्यंत रिक्त झालेल्या पदावर पदनिश्चिती करावी.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती विद्यापीठ पत्र क्रमांक/८/सी-८८/२०२५, दि.१३/०१/२०२५ या पत्राद्वारे जागा भरतीच्या संदर्भामध्ये दिलेली स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी.अश्या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
याचा परिणाम म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावतीने तात्काळ पत्र मागे घेण्यात आले त्या बदल डॉ.प्रशांत विघे यांचे कौतुक होत आहे.
0 Comments