शंकर जोगी/ विदर्भदूत वृत्त अकोला: महाराष्ट्रातील बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते तथा सामजिक कार्यकर्ते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या अनुषंगाने किरीट सोमय्या यांनी आज नागपूर , यवतमाळ आणि अकोला येथे महसूल विभागाची बैठक घेतली आहे.
अकोल्यात किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहे. या बांगलादेशी नागरिकांचा फायदा निवडणुकीत महाविकास आघाडीला झाला असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. तर बांगलादेशी नागरिकांना भारतात जन्म प्रमाणपत्र मिळवून देण्याचा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा राजकीय फायदा असल्याचंही ते म्हणाले.
अकोल्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र दिल्या गेल्याचा आरोप करीत अकोला अमरावती हे बांगलादशीयांचे केंद्रस्थान बनत असल्याचाही किरीट सोमय्या यांनी यावेळी म्हंटले.
यावर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी सुद्धा हा गंभीर मुद्दा असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र साजिद खान पठाण यांनी तोंडी न बोलता लिखित स्वरूपात सादर कराव असे आवाहन किरीट सोमय्या यांनी केले आहे.
विदर्भ दूत बातम्या जाहिरातीसाठी .
कार्यकारी संपादक
शंकर जोगी
8805153264
0 Comments