Ticker

6/recent/ticker-posts

अकोट -अकोला रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे! स्लग- शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 


शंकर जोगी -दि .२३ जाने/ विदर्भदूत वृत्त

अकोला: गत पाच ते सहा वर्षापासून अकोला- अकोट मार्गाचे काम कासव गतीने सुरू असून आता सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. यामुळे वाहतूकदारांना नाहकच मनस्ताप सहन करण्याची वेळ आली असल्याने यावर संताप व्यक्त होत आहे .याकडे प्रशासनाचे व संबंधित विभागाचे अर्थपूर्ण डोळेझाब होत असल्याची बाब समोर येताच  उपनेते व संपर्क नेते गोपीकिशन बाजोरिया ,जिल्हाध्यक्ष श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये  निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबवावे व रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.

तसेच अकोला- दर्यापूर मार्गामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्तआहे याची तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी केली आहे.  अकोला- अकोट रस्त्याचे काम गेल्या दहा वर्षापासून रखडले आहे .रस्त्यावर सिमेंट काँक्रीट चा दर्जा खालावल्याने मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत ज्यामुळे दुचाकी चालकांचे अपघात होऊन  मृत्युमुखी पडले आहे.अकोला दर्यापूर मार्गाचा मुद्दायी गंभीर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडले आहेत.तसेच पावसाळ्यात अपुर्व राहिलेले काम पूर्ण करण्याची करा अशी मागणी यावेळी  केली आहे. प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर  तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे.

         यावेळी जिल्हा अध्यक्ष श्रीरंगदादा पिंजरकर,निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष अनासने, पूर्व शहर प्रमुख ॲड पप्पु मोरवाल,शहर उपजिल्हाप्रमुख सुरेश ठाकरे,अकोला तालुका संघटक रमेश थुकेकर, शहर संघटक,जिल्हा समन्वयक स्वानंदी पांडे,जिल्हाध्यक्ष सैनिक आघाडी रामेश्वर  पाटील, सतीश गोपनारायण,बाळापुर तालुका अध्यक्ष मंगेश पाटील म्हसणे, श्रीयश ठाकरे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments