Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना(शिंदे गट) सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

अकोला पूर्व अध्यक्ष ॲड. पप्पू मरवाल यांनी केले



अकोला/shankar jogi: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता विविध पक्षाच्या वतीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे या अनुषंगाने उप नेते व संपर्क नेते  गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाध्यक्ष श्रीरंग दादा पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात  अकोला शहर पूर्वचे अध्यक्ष अँड.पप्पू मोरवार यांनी पोस्ट ऑफिस चौक येथे सदस्य नोंदणी  अभियान कार्यक्रमाचे आयोजन  केले . या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष श्रीरंगदादा पिंजरकर यांनी केले .यावेळी हजारो नागरिकांनी सदस्य नोंदणी अभियान मध्ये भाग घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी या सदस्य नोंदणीचा  जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे श्रीरंगदादा पिंजरकर आवाहन केले .यावेळी निवासी जिल्हाध्यक्ष संतोष अनासने,  उप जिल्हाप्रमुख सुरेश ठाकरे, शहराध्यक्ष योगेश अग्रवाल, तालुका संघटक रमेश थुकेकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख उषा विरक,अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख ममता आगरकर ,महानगर प्रमुख निशा ग्यारल, उपजिल्हाप्रमुख संगीता

शुक्ल, उपजिल्हाप्रमुख विजया राजपूत, 

जिल्हा समन्वयक स्वानंदी पांडे,शहरप्रमुख शुभम डहाके,  तालुका संघटक अश्विन लाळगे, उपशहर प्रमुख  शुभम वानखडे, उपशहर प्रमुख अक्षय,  राजेश कलाने, उपशहर प्रमुख मंगेश कांबळे, शहर सचिव  आदित्य ठाकूर , शाखाप्रमुख सुनील देवनाले ,शाखा उपाध्यक्ष ओम खडे ,सहप्रसिद्ध प्रमुख अथर्व वाडकर, आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश अग्रवाल यांनी केली .



उबाठाचे युवासेना उपजिल्हा प्रमुख किशोर  निमकंडे शिंदेसेनेत 

उपनेते व संपर्क नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या प्रमुख उपस्थित  जिल्हाध्यक्ष श्रीरंग दादा पिंजरकर यांच्या  यांच्या हस्ते    उबाठाचे माजी युवासेना उपजिल्हा प्रमुख किशोर  निमकंडे यांनी  शिंदेसेनेत प्रवेश केला . या प्रसंगी निमकंडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांचे स्वागत केले .

Post a Comment

0 Comments