मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी वरूड तालुक्यासह अमरावती जिल्ह्यामध्ये अतिरुष्टीमुळे व बुरशीजन्य रोगामुळे संत्रा व मोंसंबी फळ पिकांची जवळपास ६०% पेक्षा जास्त फळ गळती झाली तसेच कपाशी, सोयाबीन व इतर शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे पिक नुकसानीचे पंचनामे करुन अनुदान वाटप करण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली होती.
मोर्शी विधानसभा मतदार संघात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे ९०% शेतीमध्ये संत्रा तसेच मोसंबी या फळ पिकाची लागवड असुन, कापुस, सोयाबीन तसेच इतर पिकास नगदी पिक म्हणुन ओळखल्या जाते. ऑगस्ट २०२४ चे पावसाळ्या मधील अतिवृष्टीमुळे व बुरशीजन्य रोगामुळे मृग बहाराचे संत्रा व मोसंबी ला आलेली फळ पिकाचे प्रचंड ६०% व त्यापेक्षा जास्त फळ गळती झालेली असुन संत्रा मोसंबी पिकाची फळ गळती झाली असुन कपाशी, सोयाबीन तसेच इतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले होते. याप्रमाणे शेतीपिकाचे नुकसानी मुळे शेतकरी प्रचंड हवालदिल आर्थीक अडचणीत सापडलेला होता. त्यामुळे नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळऊन देण्यासाठी देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला होता.
तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सततच्या अवकाळी पावसामुळे बुरशीजन्य रोगामुळे संत्रा व मोसंबी फळ पिकांची मोठ्या प्रमाणात गळती झाली असल्याचे निदर्शनास आणून दिल्यामुळे सदर नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई अनुदान मिळण्याची विनंती केली होती आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन बुरशीजन्य रोगापुळे संत्र व मोसंबी फळ पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अनुदान वाटप करणेबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन विभाग यांना आवश्यक ती कार्यवाही करून प्रस्ताव सदर करण्याचे निर्देश उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले होते.
महाराष्ट्र राज्याचे मा. उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी दि. ०१.०९.२०२४ रोजी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्याचा दौरा केला. सदर दौरा कार्यक्रमास तत्कालीन आमदार देवेद्र भुयार सुद्धा उपस्थित होते. उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी वरुड तालुक्यातील मौजे नवसा पार्डी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन संत्रा पिकाचे नुकसान झाल्याने मा. उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी बाधीत क्षेत्राचे पंचनामे करुन शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यामुळे शासनाने अमरावती जिल्ह्यातील ३७३९३ हेक्टर क्षेत्राची संत्रा फळ गळती नुकसानीचा अहवाल शासनास सादर केल्यामुळे 21 जानेवारी रोजी शासन निर्णय काढून अमरावती जिल्ह्यातील ४१९११ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना १३४ कोटी ६१ लक्ष रुपयांची भरीव मदत जाहीर करण्यात आली असून अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून व तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांनी बुरशीजन्य रोगामुळे संत्रा गळती झालेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळऊन देण्यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे संत्रा वर्गीय पिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाख ८ हजाराची मदत देण्यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आधार व दिलासा देण्यासाठी शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ---- मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री.
0 Comments