मेहकर ( प्रतिनिधी ) संजीवनी युवक कल्याण, शैक्षणिक व क्रिडा प्रसारक मंडळ डोणगांव (र.नं. महा. ५२८५/९९ बुल.) व्दारा संचालीत संजीवनी सेवाभावी परिवाराच्या वतीने मेहकर येथील पत्रकार संतोष मलोसे व प्रल्हाद भिसे यांना स्व.जगदिश बिडवई स्मृर्ती प्रित्यर्थ संजीवनी दर्पन पुरस्कार जाहीर झाला आहे. संजीवनी सेवाभावी परिवार डोणगांव यांच्या २६ व्या वर्धापन दिन समारंभाचा मंगलमय धागा धरून आयोजीत केलेल्या कार्यक्रमांमध्ये कर्तुत्ववान महिला, शेतकरी, शिक्षक, पत्रकार व ध्येयवेड्या, सामाजीक असामान्य व्यक्ती सह गुणवंतांचा जिव्हाळ्याचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा दि.२ फेब्रुवारी रोज रविवारी राजुरकर मंगल कार्यालय डोणगांव येथे दिमाखात पार पडणार आहे. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे, या वर्धापन दिन सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी संजीवनी परिवाराचे अध्यक्ष डॉ गजानन उल्हामाले, राजेंद्रजी पळसकर, सौ वंदनाताई आखाडे, अनिलजी आवटी, सुरेशराव फिसके, हमीद मुल्लाजी, सुरेन्द्रसिंह चव्हाण, गणेशराव वाघमारे, डॉ नकुल फुले, डॉ शिवाजीराव बाजड, विनोदजी खंडारे, किरणजी देवकर, योगेशजी सारडा, आसीफभाई खान, हितेशजी सदावर्ते सह कार्यकारी मंडळाचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
0 Comments