मेहकर प्रतिनिधी = गित गायण,लावणी,बंजारा नृत्य, लोकगित ,देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच नाटक, विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचा उत्कर्ष कलेचा ‘जल्लोष' साजरा केला . उत्कर्ष महाविद्यालयाने नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमांची कास धरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी प्रमाणे आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी "उत्कर्ष कलेचा जल्लोष" हे वार्षिक स्नेहसंमेलन आज मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात प्रत्येक मुलाचा सहभाग कसा राहील, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले. या संमेलनाला बहुसंख्य विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी भरघोस बक्षीस देऊन चांगलीच दाद दिली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम वारंवार केले जावेत, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा मेहकर विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार लोकनेते सिद्धार्थ खरात हे होते . स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संजय खडसे, उपविभागीय अधिकारी सि.राजा, यांच्या हस्ते झाले तर प्रमुख अतिथी म्हणून सुवर्णाताई खरात ( सचिव, मंत्रालय मुंबई ) अॅड. अनंत वानखेडे सर जिल्हा व सत्र न्यायालय मेहकर नितीन बडे (नायब तहसिलदार)गोविंद गोंडे पाटील अध्यक्ष, अंकुर शिक्षण संस्थाप्र दिप बिलोरे संचालक, उत्कर्ष फाऊंडेशनगंगाधर खरात कोषाध्यक्ष, उत्कर्ष फाऊंडेशन डॉ. उत्तम अंभोरे प्राचार्य, उत्कर्ष महाविद्यालय ,भास्कर गवईसचिव, उत्कर्ष फाऊंडेशन , गंगाधरराव खरात,माजी सरपंच रामदास कहाळे यासह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त प्राध्यापक वृंद व इतर कर्मचारी इत्यादी परिश्रम घेतले.
0 Comments