शंकर जोगी / विदर्भदूत वृत्तअकोला: एसीबीने दहीहांडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत केलेल्या कारवाईत एक पोलिस शिपाई ८००० रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ पडकला आहे. यामधे आनखी आरोपी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आरोपी वर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रार कर्त्याला कुटासा पोलिस चौकीच्या ह्या पोलिस कर्मचाऱ्याने ८००० रुपयांची लाच मागितली होती.परंतु तक्रारकरत्याला ती द्यावयाची नसल्याने त्याने अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली होती.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणी कारवाईत लाचेची मागणी सिद्ध झाल्याने आज सापळा लावण्यात आला असता त्यात सदरहू पोलिस कर्मचारी अलगद सापडला असून त्याला नुकतेच ताब्यात घेतले असून दहीहंड्याच्या पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आज संध्याळाळी ७ वाजता सुरु असल्याची माहिती सुत्राने दिली आहे .
0 Comments