शंकर जोगी / विदर्भदूत वृत्त दि.28 जाने ./ वेळ 9 वा.
अकोला:अकोला एसीबीने आज मंगळवार दिनांक २८/१/२०२५ ला सायंकाळी ५:३० ते ६:०० वाजताच्या दरम्यान केलेल्या कारवाईत दहीहांडा पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल प्रफुल्ल दिंडोकार आणि एक खाजगी इसम शंकर जानराव तरोळे हे जाळ्यात अडकले आहेत,तर तिसरा एक पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश अवचार एसीबीच्या रडारवर असून त्याचाही कितपत समावेश आहे ह्याचा तपास घेतल्या जात आहे.
दहीहंडा पोलिस स्टेशनला लागूनच असलेल्या हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली असल्याने ही बातमी अख्ख्या दहीहांडा गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे.तर ह्या आरोपी म्हणून पकडण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला पाहायला गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
एसीबीची ही कारवाई सुरू असताना ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे हे दहीहांडा पोलिस ठाण्यात आपल्या केबिनमध्ये बसलेले होते मात्र कारवाईची माहिती मिळताच त्यांनी मागच्या दाराने पलायन केल्याची गावात चर्चा आहे.
एसीबीने केलेल्या कारवाईत पोलिस शिपाई प्रफुल्ल दिंडोकार, खाजगी इसम शंकर तरोळे ह्यांच्यावर दहीहांडा पोलिस स्टेशनलां गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एन सी प्रकरणांत प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रार कर्त्याला ह्या पोलिस कर्मचाऱ्याने ८००० रुपयांची लाच मागितली होती.परंतु तक्रारकरत्याला ती द्यावयाची नसल्याने त्याने अकोला एसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली होती.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणी कारवाईत लाचेची मागणी सिद्ध झाल्याने आज सापळा लावण्यात आला असता त्यात खाजगी इसमाच्या हातून लाचेची रक्कम घेत असताना सदरहू पोलिस कर्मचारी अलगद सापडला असून दोघांनाही नुकतेच उचलले असून दहीहंड्याच्या पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरहू कारवाई अकोला एसीबीचे उप अधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन सावंत,कारवाई पथकातील पो.कॉ. प्रदीप गावंडे,दिगंबर जाधव व संदीप ताले ह्यांनी केली आहे.
0 Comments