शंकर जोगी/ विदर्भदूत वृत अकोला..... संगीत सम्राट ह.भ. प. अक्रूर महाराज साखरे, गेवराई यांच्या जाहीर हरी कीर्तनाचा कार्यक्रम मंगळवार दी. 28 जानेवारी 2025 रोजी कानशिवनी येथे आयोजित करण्यात आला आहे. सौ. उषाताई विनायकराव शेळके पब्लिक स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय कानशिवनी यांचे वतीने सदर हरी किर्तन आयोजित करण्यात आले आहे. श्री. राधाकृष्ण जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी कान शिवनी चे प्रांगणात सायंकाळी 7 ते 9 या वेळात सदर हरी किर्तन होईल. संगीत व आवाजाचे सम्राट तसेच किर्तन केसरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साखरे महाराजांची ख्याती आहे. त्यांचे सोबत देवाची आळंदी येथील वारकरी गंधर्व ह. भ. प. ओंकार महाराज जगताप, बीड येथील मृदंग अलंकार भरत महाराज पठाडे, भजन सम्राट कैलास महाराज पवार आधी कीर्तन क्षेत्रातील दिग्गज या हरी किर्तन सोहळ्यात सहभागी होत आहेत. सदर कीर्तनाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक विनायकराव शेळके, राहुल शेळके व शेळके परिवाराचे वतीने करण्यात आली आहे.
0 Comments