Ticker

6/recent/ticker-posts

सशक्त संविधान ही भारतीय लोकशाहीची खरी ताकद असून तिचा वारंवार प्रत्यय आला आहे - आमदार सौ.सुलभाताई खोडके

 


अमरावती( प्रतिनिधी) जानेवारी-संविधान सभेने भारतीय राज्य घटनेचा स्वीकार केला. तर २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान लागू झाले.त्यानुसार " लोकांचे लोकांसाठी लोकांकडून चालविल्या गेलेले राज्य " अशी भारतीय प्रजासत्ताकाची खरी ओळख या देशालाच नव्हेतर संपूर्ण जगाला झाली.म्हणजेच या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.देशाने संविधानाचा स्वीकार करून २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली.भारतीय लोकशाहीच्या ७५ वर्षांनंतरही आपल्या देशाला " मदर्स ऑफ डेमोक्रॅसी " असं म्हटलं जातं.हीच भारतीय लोकशाहीची शक्ती आहे.सशक्त संविधान ही भारतीय लोकशाहीची खरी ताकद असून तिचा वारंवार प्रत्यय आला आहे.असे प्रतिपादन आमदार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले.रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी एक्स्प्रेस हाय-वे समिपस्थ प्रविण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारे संचालित विनायक विद्या मंदिर कला-वाणिज्य महाविद्यालय,विनायका गुरुकुल,विनायक विधी महाविद्यालय द्वारे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर विनायका गुरुकुल च्या संचालिका-रेखा सुर्वे,प्राचार्य-आरती निर्मळ, विनायक विद्या मंदिर कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य-डॉ.पद्माकर टाले,यश खोडके आदी उपस्थित होते. सर्वप्रथम अतिथी मान्यवरांचे हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वर्गीय-विनायकराव खोडके यांच्या प्रतिमेस नमन-वंदन-पूजन व माल्यार्पण करण्यात आले. तदनंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टच्या अध्यक्ष आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सर्व उपस्थितांनी राष्ट्रध्वज तिरंगाला सामूहिक सलामी दिली. तदनंतर राष्ट्रगीत झाले.यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत सर्व उपस्थितांनी राष्ट्राप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यादरम्यान विनायका गुरुकुलच्या चिमुकल्यांनी शिस्तबद्ध पथ संचालनाद्वारे सर्वांचे लक्ष केंद्रित केले. तदनंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी विनायका गुरुकुल च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकापेक्षा एक सरस अशा मनमोहक नृत्यांचे सादरीकरण करीत टाळ्यांच्या गजरात उपस्थितांची दाद मिळविली.२६ जानेवारी १९५० रोजी गणराज्य किंवा प्रजासत्ताक देश म्हणून आपण ओळख मिळवली.याबाबत प्रजासत्ताक दिनाचे महत्व विशद करून चिमुकल्यांनीआपल्या संबोधनात प्रजासत्ताक आणि आपण याचे महत्व अधोरेखित केले.यावेळी प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टच्या अध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.राज्यघटना लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त याप्रसंगी आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.यादरम्यान यशवंत-गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन अतिथींचे हस्ते सन्मानित करण्यात आले. यासोबतच विनायक गुरुकुल च्या संचालक-रेखा सुर्वे मॅडम यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. तसेच  नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवीकट्टा कार्यक्रमात " मानसी " या कवितेचे सादरीकरण करिता महाविद्यालयीन प्रा.डॉ.सिमरेला देशमुख यांची निवड झाल्याबद्दल आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-प्रा.डॉ.शीतल काळे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन-मास्टर प्रणित दरणे यांनी केले.याप्रसंगी विनायक विद्या मंदिर,विनायका गुरुकुल,विनायक विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी,शिक्षकेतर कर्मचारी, पालक, आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments