अकोला : न्यु महसुल कॉलनीतील मॉ जिजाऊ सार्वजनिक वाचनालयात संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजनाने व महामानवाने लिहिलेल्या संविधानाचे वाचन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी देशासाठी शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. संविधानाने देशातील लोकांना सत्ता प्रदान करून जनतेला मुलभूत अधिकार दिले. आजच्या दिवसापासून संवैधानिक लोकशाही राज्यव्यवस्था निर्माण झाल्याने संविधान समजून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंजाबराव वर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष पंजाबराव वर होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामीण बँकेचे मॅनेजर कमलेश ठाकरे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी रत्नाकर भुजाडे,ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम बगेकर, वाचनालयाच्या कोषाध्यक्षा सुनंदाताई पंजाबराव वर, सौ. जयश्री झिने, सौ. मिनाक्षी किसन शेगोकार, विद्याताई अंभोरे, सौ. सुरेखा दिनेश सोनोने, विनोद गौतम वर, सार्थक भुजाडे, आदित्य अंभोरे, रोशन शेगोकार, अजिंक्य सोनोने, कु. मंजिरी, कु. अनूजा, कु. ईश्वरी, कु. मोनू, आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव वर यांनी केले व आभार प्रदर्शन जयश्री झिने हिने मानले. सर्वांना गोडधोड मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
0 Comments