बुलढाणा= घाटबोरी तालुका मेहकर येथे नुकतेच संपन्न झालेल्या स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात भारत विद्यालय बुलढाणा च्या स्काऊट व गाईड दोन्ही संघांनी जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले आहे.
भारत स्काऊट/ गाईड जिल्हा कार्यालय बुलढाणा तर्फे 15 ते 17 जानेवारी दरम्यान जिल्हा मेळावा एम.सी.डी न्यु इंग्लिश स्कूल घाटबोरी तालुका मेहकर येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ग्रामीण व शहरी असे दोन विभागांमध्ये जिल्ह्यातील अनेक स्काऊट व गाईड संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये विविध प्रकारचे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने पथसंचलन, तंबू सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, शेकोटी कार्यक्रम, शारीरिक प्रात्यक्षिके व शोभायात्रा यासारख्या प्रत्येक स्पर्धेत भारत विद्यालय बुलढाण्याच्या स्काऊट /गाईडने सहभाग नोंदवून संपूर्ण शहरी विभागामध्ये स्काऊट व गाईड या दोन्ही विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. स्काऊट विभाग प्रमुख मनोज बैरागी व गाईड विभाग प्रमुख बेबी धुंदळे यांच्या पुढाकाराने तसेच मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड, उपमुख्याध्यापक मोहन घोंगटे, पर्यवेक्षक नवल गवई यांच्या मार्गदर्शनात स्काऊटर दिनकर पाचपोर व ज्ञानेश्वर इंगळे यांच्यासोबत गाईडर जयश्री खर्चे यांच्या नेतृत्वात एकूण 13 स्काऊट व 14 गाईड सहभागी झाले होते. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी भारत विद्यालयातील स्काऊट व गाईड शिक्षक सिद्धार्थ तायडे,देशपांडे सर,डॉ. शिवशंकर गोरे, गौरी देशपांडे, दिनेश गर्गे, गजानन राठोड, राजेश आढे,गणेश मांटे, महेश चव्हाण,अमोल बाळ,सुनील कानडजे,जयश्री देशपांडे, अर्चना फासे ,रोशनी जाधव,सविता आघाव,संतोषी शेले यांनी मेहनत घेतली.
शाळेने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्काऊट/ गाईड टीमचे भारत विद्यालय सोसायटीचे अध्यक्षा डॉ. सीमाताई आगाशे तसेच सचिव अंगद आगाशे तथा संपूर्ण संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.
0 Comments