बुलढाणा - श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्दारा संचालित स्थानिक जिजामाता महाविद्यालयात दि. २२ जानेवारी २०२५ रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश गवई तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ. सुबोध चिंचोले , प्रा. डॉ. जे. जे. जाधव तसेच विचार पिठावर श्री. शिवाजी हायस्कूल बुलढाणाचे शिक्षक दिनेश पाटील, शिरपूर येथील शिक्षीका निता भुसारी, डॉ. नामदेवराव ढाले, डॉ.एस.एल.कुंभारे उपस्थित होते.
स्कूल कनेक्ट कार्यक्रमासाठी बुलडाणा तसेच तालुक्यातील विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
मार्गदर्शकन करतांना प्रा. डॉ. सुबोध चिंचोले यांनी नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुळ संकल्पना व स्वरुप विविध उदाहरणे देऊन विद्यार्थी व शिक्षकांना समजावून सांगितले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे विविध अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त विद्यार्थी विविध कौशल्ये आत्मसात करुन आपले करिअर कसे यशस्वी करु शकेल याची माहिती दिली. त्याचप्रमाणे जिजामाता महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एन. सी. सी. , राष्ट्रीय सेवा योजना, स्पोर्ट्स, स्पर्धा परीक्षा दालन, सुसज्ज वाचनालय, व्यायामाशाळा , प्रयोगशाळा व इतर शैक्षणिक सोयी सुविधा परिपूर्ण स्वरूपात उपलब्ध असल्याची माहिती दिली.
प्रा. डॉ. जे. जे. जाधव यांनी स्वातंत्र्या नंतरच्या शैक्षणिक धोरणांचा आढावा घेतला. त्याबरोबरच राष्ट्र विकासासाठी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्षम व कौशल्य पुर्ण मनुष्यबळ निर्माण करण्याचे दृष्टीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्त्व विशद केले. त्याचप्रमाणे पारंपरिक शैक्षणिक धोरणाची चाकोरी बदलुन आंतरशाखीय ज्ञान ग्रहणाची संधी व्यापक करणाऱ्या शैक्षणिक धोरणाचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेश गवई यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात व खुल्या जागतिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर काळानुसार बदलत्या गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक धोरणात शासनाने केलेल्या बदलांचे स्वागत केले. तसेच शिक्षक, विद्यार्थी, पालक व संस्था यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची गरज असल्याचे मत प्रतिपादन केले.
याप्रसंगी विचार पिठावर उपस्थित दिनेश पाटील यांनी स्कूल कनेक्ट कार्यक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये निश्चितच उत्साह निर्माण झाला असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पवन ठाकरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. नामदेवराव ढाले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी बुलडाणा , शेलसुर व शिरपूर येथील श्री शिवाजी हायस्कूल , बुलढाणा येथील भारत विद्यालय, कोलवड येथील विद्याविकास विद्यालय, येथील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी संगीत विभागाचे वतीने विद्यापिठ गीत सादर केले. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
0 Comments