-वळण ठरताहे अपघात प्रवण स्थळ
-रोडचा कामात भ्रष्टाचार ;तरीही कारवाई नाही
-रोजच्या कामाची थातूरमातूर दागदुखी
शंकर जोगी/ विदर्भदूत वृत्त
अकोला: गतकाही महिन्यापूर्वी अकोला बार्शीटाकळी पिंजर मार्गे कारंजा( लाड) रोड चे रुंदीकरण करण्यात आले या रुंदीकरणावर कोट्यावधी खर्चही करण्यात आला; मात्र गत पावसाळातच हा रोड पूर्ण उखडला होता. तत्पुरी अनेक लोक प्रतिनिधीच्या तक्रारी नंतर या रोडची गत तीन महिन्यापूर्वी दुरुस्ती व खड्डे बुजवल्यानंतर आता पुन्हा ठिकठिकाणी मोठमोठे गड्डे पडल्यामुळे रोड मध्ये खड्डे की खड्ड्यात रोड असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे अनेक अपघात होऊन मृत्युमुखी पडल्याची घटना घडत आहे .त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना याकडे संबंधित लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सुद्धा दिसत आहे.
या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधी व विविध सामाजिक संघटनांनी केला असताना सुद्धा त्या संबंधित ठेकेदारावर कोणतीच कारवाई झाली नसल्याने त्यामध्ये मोठे अर्थकारण असल्याचे दिसून येत आहे..
बार्शीटाकळी ते पिंजर मार्गे कारंजा रोडवर वाहन धारकांना अपघात प्रवण स्थळ, अरुंद पुल, अरुंद रस्ता, टर्न, ईतर ठिकाणे दिसण्यासाठी दिशादर्शक बोर्ड येलो, व्हाईट लाईन मार्क वैगरे लावलेले नाहीत. खास करुन या टर्नवर आतापर्यंत 35 च्यावर अपघात झालेले आहेत. जानेवारी महिन्यातच पंधरा दिवसात चार वेळा मोठी वाहने पलटी झाली आहे. यासह याच ठीकाणी आतापर्यंत सात मोठे कंटेनर, दोन ट्रक, बारा कार बाकी ईतर ऑटोरिक्षा, दुचाकी पलटी होऊन अपघात झालेले आहेत. ईथे विषेश म्हणजे ट्रकसह बरेच पलटी झालेल्या वाहनातुन तसेच विशेष:त एका वॅगनआर कार मधील अपघातात तर दोन लहान मुल दोन महीलांना येथीलच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळावर पोहचुन तातडीने मदत करुन सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलेले आहे. ईथल्या पाॅईन्टसह यामार्गावरील अपघात ग्रस्त संभाव्य पाॅईन्टची पाहणी करुन ते सुरक्षित करावे ही मागणी आता परीसरातुन जोर धरत आहे. जर सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधितांनी तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन सुरक्षित नाही केले तर येथे आणी या रोडवरील अणेक अशा संभाव्य अपघात ठीकाणी मोठ्याप्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मानव जीव रक्षक दीपक सदाफळे यांनी म्हंटले आहे.
आणखी किती अपघात हवे?
आणखी किती अपघात हवेत आणखी किती जीव जायला हवे म्हणजे तुम्ही बार्शीटाकळी ते पिंजर मार्गावरील संभाव्य अपघात ठीकाणे सुरक्षित करणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी शासनास केला आहे.
0 Comments