अमरावती:( प्रतिनिधी)आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर स्माईल मुद्रा व मेडिटेशन एक प्रभावी उपचार ठरले आहे असे उद्गार ट्राय ओरिजिन स्माईल फाउंडेशनचे अभ्यासक, शोधकर्ता, प्रशिक्षक तथा संस्थापक डॉ.पंकज जैन यांनी काढले.
ते ट्रायओरिजिन स्माईल फाउंडेशन अमरावती शाखा तर्फे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होते. हॉटेल वंदू इंटरनॅशनल येथे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून शिल्पा देशमुख यांच्या स्वागत गीताने कार्यशाळेची सुरुवात झाली.
डॉ.पंकज जैन पुढे म्हणाले की, स्माईल एक्यूपंक्चर या नवीन संशोधनातून येणारे निष्कर्ष, उपचारांच्या अनेक सोप्या आणि प्रभावी पद्धती विकसित केल्या आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर स्माईल मुद्रा व स्माईल मेडिटेशनने आपण स्वतःवर व इतरांवरही प्रभावी उपचार करू शकतो. अशी माहिती देताना त्यांनी उपस्थितांना उपचाराचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
कार्यक्रमाचे आयोजन ट्रायओरिजिन सायन्स स्माईल फाउंडेशन च्या अमरावती शाखेतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अमृता जाजू व पूजा अंगाईतकर तर आभार प्रदर्शन माया आसावा यांनी केले.
कार्यशाळेचे आयोजन ट्राय ओरिजिन व स्माईल फाउंडेशन अमरावती शाखेच्या पदाधिकारी एक्यूपंक्चर थेरपीस्ट स्माईलर वैशाली बोरकर, नीलिमा भटकर, आशिष राठी, विशाल सोमकुवर, पूजा राजदेव, वैशाली शिंगणे, कविता पिंपळे, शितल देशमुख, मालती वावरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी अमरावती जिल्ह्यातील 60 पेक्षा जास्त एक्यूपंक्चर थेरपीस्ट प्रामुख्याने हजर होते. या आगळ्यावेगळ्या प्रशिक्षणाचा प्रशिक्षणार्थींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता, हे विशेष.
0 Comments