Ticker

6/recent/ticker-posts

संविधान-भारतीय लोकशाहीचे प्रतीक - प्रा.अरुण बुंदेले

 

अमरावती (प्रतिनिधी)  " भारतीय संविधान हे भारताच्या लोकशाहीचे प्रतीक आहे. २६ जानेवारी हा दिवस देशाच्या इतिहासात एक सुवर्णमय दिवस आहे. प्रजासत्ताक दिन हा दिवस नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यात मदत करते. शाळा, महाविद्यालयात होणाऱ्या विविध देशभक्तीपर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती निर्माण होते .२६ जानेवारी हा दिवस देशाच्या इतिहासात एक सुवर्णमय दिवस आहे. आपण सत्य आचरण करून व व्यसनमुक्त होऊन भारत अधिक आदर्श बनवू शकतो. प्रत्येक भारतीयांनी मी देशासाठी जे जे चांगले करता येईल ते ते केल्याशिवाय राहणार नाही,अशी शपथ आज प्रजासत्ताक दिनी घेणे व तसे आचरण करणे आवश्यक आहे."असे विचार समाजप्रबोथानकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

           ते येथील टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन तर्फे दि.२६जानेवारी २०२५ रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त असोसिएशनच्या रुक्मिणी नगर येथील कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी पदावरून विचार व्यक्त करीत होते.

          अध्यक्षस्थानी श्री नितीन व ऱ्हेकर (अध्यक्ष, टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशन) तर प्रमुख अतिथी अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बा.बुंदेले, टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री तेजस धुमाने, सचिव श्री संजीव काळे सहसचिव श्री अमोल बांबल, कोषाध्यक्ष श्री मारोती तांबट होते.

         अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

           याप्रसंगी देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमात अभंग गायक प्रा.अरुण बुंदेले यांनी स्वरचित " संविधान " या अभंग गीताचे गायन सुमधुर स्वरात करून सर्वांना मंत्रमुग्ध केले  तर गायक सर्व श्री नितीन वऱ्हेकर, मारोती तांबट,अश्विन चौधरी,योगेश शिंदे यांनी देशभक्तीपर गीतांचे दमदार गायन केले.या सुमधुर आवाजातील देशभक्तीपर गीतांमुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले.

          याप्रसंगी टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे सदस्य सर्व श्री गजानन पांडव, गजानन चौधरी ,योगेश शिंदे, इरशाद शेख अत्ताऊल्ला खाँ, अमोल देवळे, मो. फारूक मो.फिरोज, मो. आसीफ, गजानन फिरोज अ. अब्दुल चौधरी, सत्तार, योगेश बोने, आनंद सरोदे, योगेश भैरवाल, भूषण गासे ,तुषार वऱ्हेकर ,प्रशांत महाले, गोपाल गणोरकर, दिलीप पोटफोडे, मंगेश श्रीखंडे, किशोर काळे, महेश देशमुख, गणेश तांबट, विशाल पिहुलकर, मुकेश पिंजरकर, ओम मंगळूरकर, इमरान खान,विशाल शाहू, मुन्ना गुप्ता, साहील , समीर चौधरी, रोशन थोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. रसिकांनी देशभक्तीपर गीताच्या गायनाचा आनंद घेतला.

Post a Comment

0 Comments