शंकर जोगी विदर्भदूत वृत्त
अकोला: गत दिवसांपासून येथील जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात मनोविकार तज्ञ डॉक्टर यांची नियुक्ती नसल्यामुळे रुग्णांना नाहकच मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेता आज गुरुवार दि. 31 जानेवारी रोजी संपर्क नेते व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर व अकोला पूर्व शहर अध्यक्ष ॲड. पप्पू मोरवाल यांच्या मार्गदर्शनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांना निवेदन दिले. यावेळी मनोविकार तज्ञ डॉक्टरांची त्वरित नियुक्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळीदेण्यात आला.
सदर डॉक्टरचे पद रिक्त असल्यामुळे जिल्ह्यातील येणाऱ्या रुग्णांना नाहकच मनस्ताप सहन करण्याची वेळ येत आहे. त्यांना उपचार घेणे व संबंधित शासकीय अनुदानासाठी लागणारे दाखले प्रमाणपत्र व इतर सर्व वैद्यकीय संबंधित कामे प्रभावित झाली आहे . काही दिवसाआधी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे मनोविकास तज्ञ डॉक्टर यांची तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान ते आठवड्यातून एकदाच तपासण्या करत होते. सद्यस्थितीत अपंग अर्जदारांचे दोनशेच्या वर प्रमाणपत्राची कामे प्रलंबित आहेत .यामुळे शासकीय अनुदानापासून रुग्णांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजावर यापूर्वी अनेक सामाजिक, विविध राजकीय वसंघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी खंडारे यांनी निवेदन स्वीकारले व सदर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी जिल्हा सचिव सतीश गोपनारायण, शहर संघटक राजेश पिंजरकर, सरचिटणीस राहुल जाधव, तालुका संघटक रमेश थुकेकर, उपशहर प्रमुख स्वप्निल देशमुख. सुरजसिंग राजपूत,संजय चनकेशला. माजी सैनिक आघाडीचे रामेश्वर पाटील, प्रकाश इंगळे, संजय अरखराव, गणेश तिडके, सतीश शिरसागर आदी शिवसैनिकउपस्थित होते होते.
0 Comments