Ticker

6/recent/ticker-posts

अबब! अर्धवनचा रस्ता की नाला.? वाहन धारकांची होतेय सर्कस! प्रशासन आणि नेते मंडळींचे हेतु पुरस्कर दूर्लक्ष?

 


विदर्भदुत न्युज जिल्हा प्रतिनिधी: विद्यानंद सु.अहिरे

यवतमाळ : झरी तालुक्यातील मुकुटबन या दाट लोकसंख्येच्या गावाजवळील मार्की रस्त्यावरिल अर्धवन गावाच्या मुख्य रस्त्यात  असलेले मोठ्ठाले खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे चिखल होऊन नाल्याचे स्वरुप आले आहे.

     यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील  अर्धवन येथील रस्त्याचे बांधकामास मंजुरी मिळाली असूनही कंत्राटदार आणि अधिकारी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अद्यापही कामास सुरुवात झालेली नाही. खड्डयांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी होऊन पाणी व चिखल साचुन वाहन धारकांची मोठी सर्कस पहायला मिळत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या रस्त्यावरुन चिखल- पाण्यातुन उडणारा चिखल - पाणी खड्डयातुन वाहन चालवितांना भीती वाटत असून दररोज प्रवास शेकडो वाहन धारक , नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

      शासकीय कामासाठी झरी ला जाण्यासाठी या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. रस्ता बांधकामास मंजुरी मिळाली असतांनाही घोडे अडले तरी कोठे? हा सवाल त्रस्त वाहन धारक व नागरीक करीत आहे.

ठेकेदारासह प्रशासनाला या कामाचा विसर पडला आहे की हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे? असा तीव्र संताप व्यक्त होत आहे.

       लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी अद्यापही काम सुरू न केलेल्या रस्त्ता बांधकाम कंत्राटदारास त्वरित काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा संबंधित कंत्राटदारांकडून हे काम काढून घेण्यात यावे, कारण मागील दोन वर्षांपासून रखडलेला हा रस्ता अद्यापही सुरुवात झालेली नाही. नागरीक, विद्यार्थी , शासकीय कामासाठी जाणाऱ्या वाहन धारकांची होत मागील दोन वर्षांपासून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे होत असलेली गैरसोय दुर करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments