Ticker

6/recent/ticker-posts

झेनिथच्यावतीने २० जुलैला अमरावतीत राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन



अमरावती- (प्रतिनिधी)-अमरावती हा कलेचा वैभव असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याने आपले सांस्कृतिक वैभव जिवंत ठेवले असून येथील कलाकार या संस्कृतीचा वारसा जो पासत आहे.त्यामुळे येथील कला राष्ट्रीय व स्तरावर गाजलेले असल्याने अमरावतीच्या स्थानिक कलावंत या कलेचे कार्यवाहक आहेत. म्हणूनच  टीम झेनिथ इंटरनॅशनलच्यावतीने २० जुलैला राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात करण्यात आले असून निवड झालॆल्या कलावंतांना टीम झेनिथ इंटरनॅशनलच्या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव दिल्लीत १२ ऑगस्ट रोजी सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. अमरावतीच्या कलावंतांना राष्ट्रीय पातळीवर संधी देण्यात येणार असून यासाठी कलाकारांची नोंदणी सुरु झाली आहे. या  राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध कलाप्रकारात अमरावतीचे कलाकार दिल्लीत आपली कला सादर करणार आहे.

    अमरावती हा कलेचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातून अनेक नामवंत कलाकारांनी येथील कला जोपासण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे.कलावंताच्या रूपाने अमरावतीच्या मातीला कला क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अमरावतीचे नाव जागतिक स्तरावर गाजलेआहे ही अमरावतीची गौरवशाली परंपरा आहे आणि हा अमरावतीचा गौरव सुद्धा आहे. या शहराचा गौरवशाली इतिहास आहे. या शहरातुन अनेक मोठ मोठ्या कलाकारांनी आपल्या कार्य कार्य-कर्तुत्वाची सुरुवात केली आणि देशपातळीवर नावलौकिक प्राप्त केले.अमरावतीच्या कलाकारांनी समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. कला ही मानवी जीवनामध्ये चैतन्य भरणारी कला आहे कलेच्या च्या माध्यमातून कलावंतांना आत्मविश्वास येतो आणि आनंद देखील मिळतो.मानवाचा अंगी असणारी  कला ही तपश्चर्या देखील आहे. तिला मिळवण्याकरिता तिची मनापासून साधना आराधना करावी लागते.अमरावतीच्या कलेचा वैभव असलेला जिल्हा आहे.या जिल्ह्याने आपले सांस्कृतिक वैभव जिवंत ठेवले असून येथील कलाकार या संस्कृतीचा वारसा जोपासत आहे.त्यामुळे येथील कला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेली असल्याने अमरावतीचे  स्थानिक कलावंत या कलेचे कार्यवाहक आहेत. म्हणूनच टीम झेनिथच्यावतीने २० जुलैला राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात करण्यात आले असून या महोत्सवाचे उदघाटन अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार श्री बळवंत वानखडेकरणार असून प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीचे  जिल्हाधीकारी श्री सौरभ कटियार,अमरावतीचे मनपा आयुक्त श्री सचिन कलंत्रीसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव श्री अविनाश असनारे उपस्थित राहणार आहे. निवड झालॆल्या कलावंतांना स्वातंत्र्य  दिनी पर्वावर १२ ऑगस्ट रोजी टीम झेनिथ इंटरनॅशनलच्यावतीने दिल्लीतील भारती विद्यापीठ  येथे आयोजित राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात  सहभागी होण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार असून या महोत्सवाचे उदघाटन थेट केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण  राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे या करणार आहेत महोत्सवाच्या अध्यक्ष स्थानी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवलेअमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी डॉ. मनिष गवई,टीम झेनिथ इंटरनॅशनलचे सांस्कृतिक सचिव श्री मिथिल कळंबे  हे राहणार आहेत

टीम झेनिथ इंटरनॅशनलच्यावतीने अमरावतीच्या कलावंतांना राज्य  सांस्कृतिक महोत्सवात लावणी नृत्यनाट्यगायन,फॅशनमॉडेलिंग,लोकगीत,लोककला  या कला प्रकारात आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार असून  राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात निवड झालेल्या कलावंतांना टीम झेनिथ इंटरनॅशनलच्यावतीने दिनाक ५ ते १० नोव्हेंबर  दरम्यान  थाईलंड येथे आयोजित करण्यात आलेलया आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवा आपली कला सादर करण्याची संधी प्राप्त होणार आहे. या महोत्सवात भाग घेण्याची अमरावतीच्या कलाकारांना शेवटची संधी झेनिथ इंटरनॅशनलच्यावतीने देण्यात येत असून कलाकारांनी तात्काळ ९३७०१००८९८,९३७०१५२२७७वर संपर्क करण्याचे आवाहन  करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments