सभासदवाढ आणि सशक्त संघटन साधण्याचे आवाहन
राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची सदिच्छा भेट!
अकोला-- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेची एक महत्वपूर्ण सभा मुंबईत प्रभादेवीच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हॉलमध्ये दि.१० जुलै रोजी संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उत्कृष्ठ नियोजनातील या सभेचे आयोजन संघटनेचे मंत्रालयीन समन्वयक व मुंबई प्रदेश संघटक रफिक मुलाणी यांनी केले होते.यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व लोकस्वातंत्र्यचे सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यात आले.नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्यात अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ या त्यांच्यासोबत शहिद झालेल्या अशा दोन जवानांना तसेच रस्ते अपघात,आपत्तीमधील बळींना आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी व दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कल्याण जिल्हा संघटन संपर्क प्रमुख सुषमा ठाकूर यांनी श्रध्दांजली गीत गाऊन संवेदना व्यक्त केल्या.
याप्रसंगी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार,लोकस्वातंत्र्यचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीपजी रूद्राक्ष,महाराष्ट्र संघटन व संपर्क प्रमुख अरविंदजी देशमुख, राज्य पदाधिकारी व मुंबईतील दै.आदर्श महाराष्ट्रचे संपादक रघुनाथ ढेकळे,महाराष्ट्र २४ न्यूज चॅनेल च्या संपादिका अमिता कदम,मंत्रालयीन समन्वयक तथा मुंबई प्रदेश संघटन,संपर्क प्रमुख व सभा आयोजक रफिक मुलाणी, मुंबई राजनीतीचे प्रेमकुमार यादव,संजय सोळंके,अवधेश रॉय,रविकांत सिंग यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. अरविंद देशमुख,दिलीप रूद्राक्षे,रघुनाथ ढेकळे, रफिक मुलाणी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी कामगार कल्याण मंडळाचे राज्याचे कल्याण रविराज इळवे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या महाराष्ट्रातील प्रगतीची माहिती घेण्यात आली.
मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसातही सभेला हजेरी लावणाऱ्या सभासद पदाधिकाऱ्यांचे अध्यक्षांनी अभिनंदन करून त्यांना लोक स्वातंत्र्याच्या पत्रकार आणि सामाजिक हिताच्या प्रभावी आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.मुंबईतील प्रथम सभा आणि त्यात सर्व एकत्र आल्याने सर्वांनी आपले परिचय सादर केले.यश हे कुणा एकट्याचे नसते ते सामुहिक शक्तीचा आविष्कार असते.म्हणून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही महाराष्ट्रातील एक संवेदनशील अग्रेसर संघटना म्हणून अभिप्राय मिळत आहेत.त्या सत्त्यावर अधिक शिक्कामोर्तब होण्यासाठी पदाधिकारी आणि सभासदांनी आपल्या हक्क आणि न्याय प्राप्तीच्या लढ्याला नेहमी यशस्वी ठरविण्यासाठी प्रचंड सभासद वाढ करून प्रभावी आणि सशक्त संघटन निर्माण करावे,असे आवाहन संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी केले.यासाठी आम्ही निरंतर आपणासोबत राहू अशा प्रतिक्रिया पदाधिकारी व सभासदांमधून व्यक्त झाल्यात.पाऊस आणि वाहतूक व्यत्ययामुळे बोईसर येथील सभासद पदाधिकाऱ्यांना उपस्थिती देता आली नाही.कार्यक्रमाचे संचलन सुषमा ठाकूर यांनी केले.याप्रसंगी रफिक मुलाणी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
0 Comments